पुणे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; मानधन नाकारून गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

0
पुणे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; मानधन नाकारून गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

पुणे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; मानधन नाकारून गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारून ते महापौर निधीत वर्ग करण्याचा निर्णय घेतला; शहरातील गरजू रुग्णांना मिळणार मदत.

पुणे १० जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ (ब) मधून निवडून आलेले नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात एक आदर्श आणि समाजाभिमुख निर्णय घेतला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन तसेच अन्य भत्ते स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत, ही संपूर्ण रक्कम पुणे महानगरपालिकेच्या ‘महापौर निधी’मध्ये वर्ग करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. या निधीतून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १९ (अ) (१) अंतर्गत निर्वाचित सभासदांना मानधन देण्याची तरतूद आहे. मात्र, या तरतुदीचा लाभ न घेता मानकर यांनी आपले मानधन समाजहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात दरमहा मिळणारी संपूर्ण मानधनाची रक्कम महापौर निधीत जमा करण्यात यावी आणि ती रक्कम गरजू रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेच्या राजकारणात एक सकारात्मक संदेश गेला असून, विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले की, राजकारण हे केवळ पद किंवा मानधनासाठी नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. नगरसेवक पद ही सेवा करण्यासाठी मिळालेली जबाबदारी असून, नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाच्या बदल्यात मानधन स्वीकारणे त्यांना योग्य वाटत नाही. नागरिकांच्या करातून मिळणारे पैसे पुन्हा त्यांच्याच सेवेसाठी वापरले जावेत, या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपल्या मानधनाचा उपयोग त्यांच्या आरोग्यासाठी होणे, हेच खरे समाधान देणारे असल्याचे मानकर यांनी स्पष्ट केले.

राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्याच टप्प्यातील असून, त्यामागे मिळालेला प्रचंड जनसमर्थनही महत्त्वाचा मानला जात आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याची कामगिरी केली आहे. प्रभाग क्रमांक २५ (ब) मधून त्यांनी तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. एकूण ३१ हजार ९८१ मते मिळवत त्यांनी ७९.३४ टक्के मतदानाचा टक्का गाठला, जो राज्यात सर्वाधिक आहे.

या प्रभागातील चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे सर्व विजयी झाले आहेत. मात्र, मानधन नाकारण्याचा निर्णय घेऊन मानकर यांनी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या या कृतीमुळे राजकारणातील नैतिकता, पारदर्शकता आणि समाजसेवेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, भविष्यात इतर लोकप्रतिनिधींनाही अशा निर्णयांची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed