झंवर बिल्डर प्रकरणाला नवे वळण; CBI चौकशीची मागणी; पुणे पोलिसांवरील विश्वास डळमळीत?
CBI
पुण्यातील रिअल इस्टेट वादाला नवे वळण
पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२६: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, बिल्डर विश्वजीत झंवर यांनी दाखल केलेल्या कथित ३७.४८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
झंवर यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी अर्ज सादर करत, संबंधित प्रकरण हे यूएलसी (Urban Land Ceiling) संदर्भातील असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून न करता तो तात्काळ CBI कडे वर्ग करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, झंवर यांचा पुणे पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे काय, असा प्रश्नही चर्चेतून उपस्थित केला जात आहे.

तक्रारीनुसार, काही रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये जमीन विकासासाठी घेतल्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्यात आले नाहीत, तसेच संबंधित रकमेची परतफेडही करण्यात आलेली नाही. या संदर्भात सुमारे ३७.४८ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, CBI चौकशीसाठी न्यायालयात रिट याचिकाही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात या घडामोडींवरून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, पुढील तपासाची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information