Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

0
Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली अंतिम निर्णय सुनेत्रा पवाPune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?र घेणार?

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक १८ मार्च २०२६ रोजी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती.


राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अधिकृत निवड कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांनी अंतर्गत बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांवरही राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सभापती पदांबाबतही उत्सुकता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील तातडीच्या कार्यक्रमामुळे त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली. बैठकीस मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर तसेच जिल्हाध्यक्ष संभाजी नाना होळकर उपस्थित होते.

गटनेता निवडीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली असून काही नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गटनेता ६ तारखेला निश्चित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र गटनेता म्हणजेच अध्यक्ष असे बंधन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गटनेता निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाचाही विचार होऊ शकतो. त्यामुळे अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या स्तरावरच घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, ६ तारखेला पुणे जिल्हा बँकेत होणाऱ्या बैठकीत एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषद संदर्भातील ठराव मंजूर करून अधिकृत गट स्थापन करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १८ मार्च २०२६ रोजी पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवड कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय हा पक्षांतर्गत चर्चेनंतरच निश्चित होणार आहे. उपाध्यक्षपदासाठीही अनेक इच्छुक पुढे सरसावले असून तालुकानिहाय प्रतिनिधित्व, सामाजिक समतोल आणि राजकीय गणित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी गटनेता निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र अंतिम निर्णयाचा अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने उमेदवारीबाबतचा शेवटचा शब्द त्यांचाच असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed