2025 मधील सुपरहिट सिनेमा ‘रेड 2’: निर्मात्यांची लॉटरी, बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई

0
2025 मधील सुपरहिट सिनेमा 'रेड 2': निर्मात्यांची लॉटरी

2025 मधील सुपरहिट सिनेमा 'रेड 2': निर्मात्यांची लॉटरी

अजय देवगनचा ‘रेड 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट; 120 कोटींच्या बजेटवर तब्बल 241 कोटींची कमाई, IMDb वर 7.1 रेटिंग मिळाली.

सायली मेमाणे

२६ जून २०२५ : 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे आले, मात्र एक सिनेमा असा होता ज्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि निर्मात्यांच्या खिशात कोट्यवधींची कमाई टाकली. अजय देवगनचा ‘रेड 2’ हा क्राइम-थ्रिलर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत हिट ठरला.

‘रेड 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून हा 2018 मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. अजय देवगनने पुन्हा एकदा इनकम टॅक्स ऑफिसर अमय पटनायकची भूमिका निभावली असून या वेळेस कथा राजस्थानमध्ये ट्रान्सफर झालेल्या अमयभोवती फिरते. तिथे तो एका भ्रष्ट नेत्यावर – रितेश देशमुख द्वारा साकारलेल्या ‘दादाभाई’वर – धाडसी कारवाई सुरू करतो, आणि इथून सुरू होतो थरारक प्रवास.

चित्रपटात अजय देवगनचा संयमी आणि प्रभावी अभिनय तर दिसतोच, पण रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत कमाल केली आहे. त्यांच्या द्वंद्वामुळे सिनेमा अधिक रंगतदार झाला. त्यांच्यासोबत वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, गोविंद नामदेव आणि सुप्रिया पाठक यांचाही अभिनय लक्षवेधी ठरतो.

सिनेमाचे बजेट सुमारे ₹120 कोटी इतके होते. मात्र बॉक्स ऑफिसवर भारतातच ₹176.93 कोटींची कमाई झाली, तर जागतिक स्तरावर हा आकडा ₹241.68 कोटींवर पोहोचला. यावरून स्पष्ट होते की, ‘रेड 2’ ने आपले बजेट केवळ वसूलच केले नाही, तर त्याच्या दुप्पटीहून अधिक कमाई करून निर्मात्यांना मालामाल केले.

‘रेड 2’ ला IMDb वर 7.1 इतकं सन्माननीय रेटिंग मिळालं आहे. या सिनेमाचे “नशा” हे आयटम साँग विशेष गाजलं असून त्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाने दिलखेचक परफॉर्मन्स दिला आहे. सिनेमाची गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहेत.

सध्या ‘रेड 2’ नेटफ्लिक्सवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असून जे प्रेक्षक थिएटरमध्ये पाहू शकले नाहीत, ते आता घरीच हा थरार अनुभवू शकतात. समीक्षकांकडून मिळालेली प्रशंसा, कमाईचे आकडे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, ‘रेड 2’ हा 2025 चा सर्वात यशस्वी आणि चर्चेत असलेला सिनेमा ठरला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed