रूबी हॉल क्लिनिक येथे इंडियन सोसायटी ऑफ न्युरो आँकोलॉजी (ईसनोकॉन) २०२६ चे आयोजन

0
रूबी हॉल क्लिनिक येथे इंडियन सोसायटी ऑफ न्युरो आँकोलॉजी (ईसनोकॉन) २०२६ चे आयोजन

रूबी हॉल क्लिनिक येथे इंडियन सोसायटी ऑफ न्युरो आँकोलॉजी (ईसनोकॉन) २०२६ चे आयोजन

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे २ ते ५ एप्रिल दरम्यान ईसनोकॉन २०२६ परिषद; न्युरो आँकोलॉजीतील जागतिक तज्ञांची उपस्थिती आणि रेडिओ आँकोलॉजी विभागाच्या ५० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा.

पुणे, ०२ एप्रिल २०२६ : रूबी हॉल क्लिनिक येथे इंडियन सोसायटी ऑफ न्युरो आँकोलॉजी (ईसनोकॉन) २०२६ चे आयोजन

· जागतिक पातळीवरील न्युरो-आँकोलॉजी तज्ञ एकाच मंचावर
· रूबी हॉल क्लिनिकच्या रेडिओ आँकोलॉजी नेतृत्वाची ५० वर्षे

पुणे, ०२ एप्रिल २०२६ : रूबी हॉल क्लिनिक येथे ईसनोकॉन २०२६ या इंडियन सोसायटी ऑफ न्युरो आँकोलॉजीच्या वार्षिक परिषदेचे २ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.जागतिक पातळीवरच्या १७ व्या अशा प्रकारची ओळख असलेल्या या परिषदेमध्ये न्युरो आँकोलॉजी विषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ एकत्र येणार असून मेंदू आणि मणक्याच्या गाठींवरील उपचारांच्या बाबतीत पुणे शहर जागतिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल. या परिषदेचे उद्घाटन बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांसह डॉ.परवेझ ग्रांट,डॉ.सिमोन ग्रांट,नताली ग्रांट नंदा,उत्कर्ष भोटे व रूबी हॉल क्लिनिक आँकोलॉजी विभागातील तज्ञ डॉ.भूषण झाडे,डॉ.मानसी मुन्शी गिरमे आणि डॉ.नीरज धिंग्रा यांच्या उपस्थितीत होईल.

बहुशाखीय व्यासपीठ म्हणून डिझाईन केलेले ईसनोकॉन २०२६ न्युरो सर्जन ,न्युरोलॉजिस्ट,रेडिएशन व मेडिकल आँकोलॉजिस्ट,न्युरो पॅथोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांना एकत्र आणेल. ही परिषद निवासी डॉक्टर्स,शिकाऊ डॉक्टर्स, नवे स्पेशालिस्ट यांच्यासाठी उपयुक्त असून रूग्ण प्रकरण आधारित चर्चा,शोध निबंध,तज्ञांचे मार्गदर्शन असलेली सत्रे आणि प्रात्याक्षिक कार्यशाळा यांचा समावेश आहे.वैज्ञानिक कार्यक्रमांमध्ये मॉलेक्युलर डायग्नोस्टिक्स,ॲडव्हान्स्ड इमेजिंग,प्रिसिजन रेडिओ थेरपी,इम्युनोथेरपी पध्दती यांचा समावेश आहे.या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी होणार असून नेदरलँडस येथील प्रा.मार्टिन वॅन डेन बेंट,थायलंड येथील प्रा.डॉ.शानोप श्युएँगशोटी,जर्मनी येथील डॉ.अरिबा पटेल,युएसए येथील डॉ.संतोष केसरी,डॉ.विनय पुडुवल्ली,डॉ.दीपा संपत आणि डॉ.अश्वथा नारायणा यांचा समावेश आहे.न्युरो आँकोलॉजी व कर्करोग संशोधन क्षेत्रातील योगदानाकरिता त्यांची ओळख आहे.

हा कार्यक्रम एका ऐतिहासिक टप्प्याशी सुसंगत आहे,ते म्हणजे – रूबी हॉल क्लिनिकच्या रेडिओ आँकोलॉजी विभागाचा ५० वा वर्धापन दिन.१९७६ मध्ये मुंबई बाहेरील महाराष्ट्रातील पहिली रेडिओ थेरपी सुविधा स्थापित केल्यापासून हा विभाग जीव वाचविणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे.या विभागाच्या वारशामध्ये २००५ मध्ये आशियातील (जपान ) वगळता पहिले एमव्हीसीबीसीटी – आयजीआरटी आणणारे तसेच २०२३ मध्ये ॲडव्हान्स्ड सायबर नाईफ एस ७ तंत्रज्ञान आणण्याचा समावेश आहे.आजवर २५,००० रूग्णांवर उपचार आणि ५ लाख थेरपी सत्रे प्रदान करत हा विभाग आजही नाविन्य आणि अचूक उपचारांचे एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून उभा आहे.

रूबी हॉल क्लिनिक चे चीफ कार्डिओलॉजिस्ट, अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.पी.के.ग्रांट म्हणाले की,आमच्या रेडिएशन आँकोलॉजी विभागाची ५० वर्षे साजरी करत असताना कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात किती मोठी प्रगती झाली आहे,याचा आढावा घेण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे,तसेच भारतातील रूग्णांपर्यंत अत्यंत प्रगत आणि रूग्ण केंद्रित उपचार पोहचविण्याची आमची कटिबध्दता पुन्हा अधोरेखित करण्याची हीच वेळ आहे.यासोबतच आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही बालकाला उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही,याची खात्री करण्यासाठी आम्ही दृढ निश्चयी आहोत.याच उद्देशाने गरजू बालरूग्णांना आम्ही मोफत कर्करोग उपचार उपलब्ध करून देत आहोत.

रूबी हॉल क्लिनिक मधील फिजिशयन व विश्वस्त डॉ.सिमोन ग्रांट म्हणाले की, जागतिक कौशल्य आणि भारताचा वैद्यकीय अनुभव याचा संगम ज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी एक शक्तीशाली व्यासपीठ आहे.रूबी हॉल क्लिनिकमधील रेडिएशन आँकोलॉजीचे भविष्य आमची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील व्याप्ती विस्तारण्यावर केंद्रित आहे.एस्ट्रो २०२५ मध्ये सहा सादरीकरणे आणि २०२६ मध्ये नियोजित आणखी चार सादरीकरणे त्याचबरोबर एक भक्कम बीएनबी अध्यापन कार्यक्रम यांच्या जोरावर आम्ही उच्च दर्जाचे वैद्यकीय संशोधन आणि भविष्याभिमुख चाचण्या (प्रॉस्पेक्टिव्ह ट्रायल्स) पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून यामुळे भविष्यातील कर्करोग उपचारांना आकार मिळेल.

रूबी हॉल क्लिनिकमधील सायबरनाईफ रेडिओ सर्जरी आणि रेडिएशन आँकोलॉजी विभागातील प्रमुख सल्लागार व संचालक डॉ.भूषण झाडे म्हणाले की,न्युरो आँकोलॉजी क्षेत्रातील वाढती गुंतागुंत लक्षात घेता ईसनोकॉन सारखे व्यासपीठ हे वैद्यकीय उपचार पद्धतींची सांगड अद्ययावत वैज्ञानिक पद्धतींशी घालण्यासाठी उपयुक्त ठरेल.रूबी हॉल क्लिनिकमध्ये रुग्णांना अधिक अचूक व प्रभावी उपचार देण्यासाठी प्रिसिजन रेडिओ थेरपी,प्रगत इमेजिंग आणि बहुशाखीय कौशल्य यांचा समन्वय साधण्यावर आमचा भर आहे.

जगभरातील तज्ञ वैज्ञानिक कार्यक्रम आणि स्पष्ट क्लिनिकल उद्दिष्टांसह ईसनोकॉन २०२६ हे रेडिएशन आँकोलॉजी विभागाची गौरवशाली ५० वर्षे साजरी करत असताना आँकोलॉजी सेवेला पुढे नेण्याच्या रूबी हॉल क्लिनिकच्या वचनबध्दतेला अधिक दृढ करते.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed