पुनीत बालन यांची अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी निवड कबड्डीला नवी दिशा मिळणार

0
पुनीत बालन यांची अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी निवड कबड्डीला नवी दिशा मिळणार

पुनीत बालन यांची अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी निवड कबड्डीला नवी दिशा मिळणार

प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. कबड्डी खेळाच्या विकासासाठी पारदर्शकता, व्यावसायिक नियोजन आणि तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पुणे ०३ जून २०२६ : महाराष्ट्रातील कबड्डी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड घडली असून पुण्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांची अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. क्रीडा व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव आणि राज्यातील विविध क्रीडा उपक्रमांमधील योगदान लक्षात घेऊन संघटनेने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या विशेष कार्यकारी बैठकीत पुनीत बालन यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. संघटनेला अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ही बैठक सपना वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भारती जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याच्या विविध भागांतील पदाधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. पुनीत बालन यांच्या निवडीचा प्रस्ताव सातारा येथील ज्ञानेश काळे यांनी मांडला, तर छत्रपती संभाजीनगर येथील गोकुळ तांदळे यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या निवडीचे स्वागत केले.

पुनीत बालन हे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील एक सक्रिय आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, युवा खेळाडूंना प्रोत्साहन, व्यावसायिक क्रीडा लीग्सना पाठबळ आणि क्रीडा विकासासाठी सातत्याने काम करण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कबड्डी संघटनेला अधिक व्यावसायिक आणि आधुनिक दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

निवडीनंतर बोलताना पुनीत बालन यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला पारंपरिक खेळ असून त्याला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेत पारदर्शकता, प्रभावी नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विशेषतः ग्रामीण भागातील आणि तळागाळातील प्रतिभावान कबड्डीपटूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात खेळाडूंच्या प्रशिक्षण, स्पर्धा आयोजन आणि क्रीडा पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्राबरोबरच पुनीत बालन यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी निर्मिती केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटावर आधारित हिंदी चित्रपट ‘अंतिम’ची निर्मिती करण्यात आली होती. तसेच ‘आशेची रोषणाई’, ‘द हिंदू बॉय’ आणि ‘गुड शॉट’ यांसारख्या प्रकल्पांमधूनही त्यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या निवडीमुळे राज्यातील कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *