लोणावळ्यात 31 जुलैपर्यंत निर्बंध लागू! धबधबे, सेल्फी, रील्सवर बंदी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

0
लोणावळ्यात 31 जुलैपर्यंत निर्बंध लागू! धबधबे, सेल्फी, रील्सवर बंदी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

लोणावळ्यात 31 जुलैपर्यंत निर्बंध लागू! धबधबे, सेल्फी, रील्सवर बंदी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर BNSS कलम 163 अंतर्गत 31 जुलैपर्यंत निर्बंध लागू. धबधबे, धोकादायक ठिकाणी सेल्फी, रील्स आणि मद्यपानावर बंदी.

पुणे ०७ जुलै २०२६ : मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असताना लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अंतर्गत लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष निर्बंध लागू केले आहेत. हे आदेश 6 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय पर्यटनावर बंदी घालण्यासाठी नसून पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे, नद्या, ओढे आणि धरण परिसरात पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या भागांमध्ये प्रवेश करणे धोकादायक ठरू शकते.

नवीन आदेशानुसार कोणत्याही पर्यटकाला धबधबे, नद्या, ओढे किंवा धरण परिसरातील पाण्यात उतरण्यास परवानगी असणार नाही. तसेच धोकादायक कडे, दऱ्या आणि उंच ठिकाणी सेल्फी काढणे, व्हिडिओ शूट करणे किंवा सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिर, भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि तुंग किल्ला या लोकप्रिय पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या भागांमध्ये पोलीस आणि प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

याशिवाय पर्यटनस्थळी मद्यपान करणे, कचरा टाकणे, ध्वनीप्रदूषण करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतींवरही बंदी घालण्यात आली आहे. महिलांची छेडछाड, बेदरकार वाहनचालक, बेकायदेशीर कृत्ये आणि धरण तसेच नदीकाठच्या संवेदनशील भागात चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. लोणावळा–कर्जत घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे रुळांवर मोठे दगड, माती आणि मलबा जमा झाला असून अनेक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्ती आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

पावसाळ्यात लोणावळा आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed