भारताच्या ताफ्यात सामील होणार आणखी तीन अपाचे हेलिकॉप्टर; पाकिस्तानची चिंता वाढली

भारताच्या ताफ्यात सामील होणार शत्रूचा कर्दनकाळ!
भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार! अमेरिका भारताला आणखी तीन घातक AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर देणार आहे. जाणून घ्या या हेलिकॉप्टर्सचे खास वैशिष्ट्ये आणि भारतीय वायूदलात भरतीची संधी.
सायली मेमाणे
नवी दिल्ली ४ जुलै २०२५ : भारताच्या ताफ्यात सामील होणार शत्रूचा कर्दनकाळ! अमेरिका देणार अपाचे AH-64E अटॅक हेलिकॉप्टर; भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार
भारताच्या संरक्षण सामर्थ्यात लवकरच मोठी भर पडणार आहे. अमेरिका भारताला या महिन्यात तीन अत्याधुनिक अपाचे AH-64E अटॅक हेलिकॉप्टर्स देणार असून यामुळे वायूदलाच्या ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे. भारत सध्या ‘मेड इन इंडिया’ तत्वाला प्रोत्साहन देत स्वतःची संरक्षण क्षमता वाढवत आहे. हे हेलिकॉप्टर्स भारताच्या शत्रूंना दहशत निर्माण करतील इतके घातक असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत.
सध्या भारतीय वायुसेनेकडे 22 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. आणखी 6 हेलिकॉप्टर्स भारताने मागवले असून त्यातील 3 या महिन्यात तर उर्वरित 3 वर्षअखेरीस भारतीय हद्दीत दाखल होतील. AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने बनवले गेले असून त्यात नाईट व्हिजन सिस्टम, मिसाईल लाँचर, आधुनिक रडार आणि हल्ल्याच्या अचूक क्षमतेने सज्ज असलेली ऑटोमॅटिक गन बसवलेली आहे. यामध्ये 70mm रॉकेट्स आणि अत्यंत अचूक लक्ष्यवेधक क्षमताही आहे.
या हेलिकॉप्टर्समुळे सीमारेषेवरील सुरक्षेत मोठी भर पडणार असून पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू देशांना हे हेलिकॉप्टर खूप मोठा अडथळा ठरणार आहे. युद्धजन्य स्थितीत किंवा दहशतवादी कारवायांवर उत्तर देण्यासाठी हे हेलिकॉप्टर्स अत्यंत प्रभावी भूमिका बजावतील.
या बातमीबरोबरच तरुणांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय वायुसेनेत भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘अग्निपथ योजना’ अंतर्गत अग्निवीर वायु इनटेक 1/2026 साठी अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन परीक्षा 25 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावे, म्हणजेच वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षांदरम्यान आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 12वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, त्यातही भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयात किमान 50% गुण आवश्यक आहेत. तसेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स सारख्या ट्रेडमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र आहेत, परंतु त्यांनी देखील किमान 50% गुण मिळवलेले असावेत. दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेले आणि संबंधित विषयांमध्ये ५०% गुण असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
भारतीय वायुदलाच्या या शक्तिवृद्धीमुळे देशाच्या सुरक्षिततेला बळ मिळणार असून तरुणांना देशसेवेसाठी उत्तम संधी प्राप्त होणार आहे. भारताच्या ताफ्यात हे घातक हेलिकॉप्टर दाखल झाल्यानंतर देशाची लष्करी ताकद अधिक मजबूत होणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter