कराडमध्ये चुलता-पुतण्याला लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; 10 जणांवर गुन्हा दाखल

0
कराडमध्ये चुलता-पुतण्याला लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

कराडमध्ये चुलता-पुतण्याला लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

कराडमधील सैदापूरमध्ये चुलता आणि पुतण्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. लोखंडी गज, लाकडी दांडक्याने दोघांवर हल्ला करण्यात आला असून 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायली मेमाणे

कराड ४ जुलै २०२५ : कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात गुन्हेगारी प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. सैदापूर येथील एका लॉजसमोर चुलता आणि पुतण्याला लोखंडी गज, लाकडी दांडके आणि विटांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात योगेश सुनील पाटील (वय ३४, रा. वारुंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य गायकवाड, अथर्व पाटील, निखिल शेळके, भूषण भोसले, सनी पवार, सौरभ कालेकर, गणराज पवार, पार्थ पाटील, आशिष पाटील आणि इतर एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचं मूळ कारण कुटुंबीयांचा फोटो असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला. फिर्यादी योगेश पाटील यांना आदित्य गायकवाडच्या मोबाईलमध्ये त्यांच्या कुटुंबातील काही फोटो दिसले. त्यावरून त्याने आदित्यकडे स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर योगेश पाटील आणि त्याचा पुतण्या प्रथमेश अनिल पाटील दोघेही सैदापूरमध्ये आदित्यला जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या अन्य आरोपींसह एकत्रितपणे दोघांवर हल्ला करण्यात आला.

हल्लेखोरांनी लोखंडी गज, लाकडी दांडके आणि विटांचा वापर करत योगेश आणि प्रथमेश यांना मारहाण केली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

ही घटना कराड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करणारी असून स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed