• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी ‘पाकोळी’ युनिट ४ च्या ताब्यात

Jul 12, 2025
मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी ‘पाकोळी’ युनिट ४ च्या ताब्यातमोक्का गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी ‘पाकोळी’ युनिट ४ च्या ताब्यात

दोन वर्षांपासून अपहरण व मारहाण प्रकरणात फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी कल्पेश कराळे उर्फ पाकोळी युनिट ४ च्या पथकाच्या कारवाईत अखेर अटकेत.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १२ जुलै २०२५ : – चतु:शृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील २०२३ साली घडलेल्या अपहरण, मारहाण आणि गुन्हेगारी कारवायांतील प्रमुख आरोपी कल्पेश रमेश कराळे उर्फ रोहन घोलप (टोपणनाव पाकोळी, वय २६, रा. गोखलेनगर, पुणे) याला अखेर गुन्हे शाखा युनिट‑४ च्या पथकाने मनमाड (जि. नाशिक) येथून ताब्यात घेतले आहे. तो गेली दोन वर्षे पोलिसांना चकवा देत होता.

ही कारवाई युनिट‑४ चे पोलीस हवालदार अजय गायकवाड आणि पोलीस अंमलदार वैभव रणपिसे यांनी केली. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर, तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पोलीस यंत्रणांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.

कल्पेश कराळे उर्फ पाकोळी याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गु.र. क्र. ८७४/२०२३ नुसार भारतीय दंड विधान कलम 364A, 323, 504, 506(2), 141, 143, 145, 147, 148 तसेच हत्यारे कायदा कलम 4(25) व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) 1999 अंतर्गत गंभीर आरोप आहेत. या गुन्ह्यात तो मुख्य पाहिजे आरोपी होता.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असून, पुढील कारवाईसाठी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा, युनिट‑४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली असून, अशा गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडून अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune