पुण्यातील प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना रद्द; बन मस्क्यात सापडले काचेचे तुकडे

0
पुण्यातील प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना रद्द

पुण्यातील प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना रद्द

पुण्यातील कॅफे गुडलकमध्ये बन मस्क्यात काचेचे तुकडे सापडल्याने अन्न व औषध प्रशासनाने कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला. त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : पुणे: शहरातील सुप्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईनंतर तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. गुडलक कॅफेमध्ये बन मस्का पदार्थामध्ये काचेचे तुकडे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने तपासणीदरम्यान कॅफेमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेली ही घटना गंभीर मानली गेली असून प्रशासनाने कॅफेचा अन्न परवाना त्वरित निलंबित केला. त्रुटी दूर होईपर्यंत कॅफेचा परवाना रद्दच राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफे हे अनेक दशकांपासून ग्राहकांचे आकर्षण ठरले आहे. मात्र अलीकडेच एका ग्राहकाने खाल्लेल्या बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. या प्रकारामुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed