• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणावर PMC ची कारवाई; ६,७०० चौरस फुट जागा मुक्त

Jul 16, 2025
वानवडीतील साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची कारवाईवानवडीतील साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

पुणे महानगरपालिकेने साळुंखे विहार रोड ते कौसर बाग मशिदपर्यंतच्या भागातील अतिक्रमण हटवले. हातगाड्या, फळभाज्यांचे स्टॉल, लोखंडी काउंटरसह ६,७०० चौ.फुट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली.

सायली मेमाणे

पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : वानवडीतील साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई; ६,७०० चौ.फूट जागा मोकळी

पुणे : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (सोमवार) वानवडीतील साळुंखे विहार रोड ते कौसरबाग मशिद या रस्त्यालगत मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. फुटपाथ आणि इमारतीसमोरील फ्रंट मार्जिनमध्ये उभारलेली अनधिकृत बांधकामे व हातगाड्यांविरुद्ध ही मोहीम राबवण्यात आली.

ही संयुक्त मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, बांधकाम विकास विभाग, तसेच सुरक्षा विभागाच्या सहकार्याने पार पडली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एकूण १० हातगाड्या, १२ लोखंडी काउंटर, १५ भाजीपाल्याच्या टपऱ्या आणि २ अतिरिक्त किऑस्क हटवले. याशिवाय ६ ट्रक भरून जप्त केलेला साहित्य मनपाच्या गोदामात हलवण्यात आला.

तसेच, अंदाजे ६,७०० चौ.फूट क्षेत्रफळ व्यापणाऱ्या अनधिकृत तात्पुरत्या आणि कायम स्वरुपाच्या संरचना उद्ध्वस्त करण्यात आल्या. कारवाईच्या वेळी मनपाचे कनिष्ठ अभियंता सोपान रुपनार, प्रादेशिक अतिक्रमण निरीक्षक गणेश तारु, सहाय्यक निरीक्षक राकेश काची, तसेच १० अधिकारी व ४२ सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. यासाठी महापालिकेने १ जेसीबी मशीन, ६ ट्रक आणि १८ एमएसएफ जवान तैनात केले होते.

या मोहिमेबाबत प्रादेशिक अतिक्रमण निरीक्षक गणेश तारु यांनी सांगितले की, “सार्वजनिक जागा मुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांवर पुढेही नियमित कारवाई करण्यात येणार आहे.”

📌 हायलाइट्स :

पुढील कारवाया सुरूच राहणार

साळुंखे विहार रोड ते कौसरबाग मशिद दरम्यान कारवाई

१० हातगाड्या, १५ टपऱ्या, १२ काउंटर जप्त

६,७०० चौ.फुट अतिक्रमण हटवले

६ ट्रकमाल मनपा गोदामात हलवले

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune