पुणे विमानतळावर अजूनही वाघर दाखल, पक्षी व कुत्री यामुळे विमाने धोक्यात. PMC ने जंतुनियंत्रण वाढवले, अशात प्रवाशांनी आगाऊ नियोजन करणे गरजेचे आहे.
सायली मेमाणे
पुणे १७ जुलै २०२५ : पुणे – पुणे विमानतळ परिसरात सध्या वन्यप्राण्यांचा वावर वाढत चालल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बिबट्या, भटके कुत्रे आणि पक्ष्यांचा वावर वाढल्यामुळे विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवर धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळ परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तो कैदही झाला असून अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रवासी, विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याशिवाय, मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची संख्या आणि भटक्या कुत्र्यांचा त्रासही वाढला आहे. यामुळे रनवेवर विमानांना थेट धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वनविभागाला सूचना दिल्या असल्या, तरीही परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही.
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकारी आणि एअरलाइन कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आहे. कारण कोणत्याही वेळी पक्ष्यांशी किंवा कुत्र्यांशी विमानांची धडक होऊन मोठा अपघात होऊ शकतो. सध्या काही उड्डाणांना उशीर होत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, मात्र अजूनही तो पकडला गेलेला नाही. काही सुरक्षा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अतिरिक्त गस्त वाढवली आहे. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना सावध राहण्याचं आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.
ही संपूर्ण परिस्थिती पाहता, संबंधित विभागांनी त्वरीत उपाययोजना न केल्यास, भविष्यात गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter