• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबईत Uber-Ola संपामुळे वाहतूक ठप्प; विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना आधीच नियोजन करण्याचे आवाहन

Jul 17, 2025
मुंबईत Uber-Ola संपामुळे वाहतूक ठप्प मुंबईत Uber-Ola संपामुळे वाहतूक ठप्प

Uber, Ola आणि इतर ॲप आधारित सेवांवर नियमनाच्या मागणीसाठी मुंबईत Azad Maidan येथे टॅक्सी-रिक्षाचालकांचा संप सुरू आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करून आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

सायली मेमाणे

मुंबई, १७ जुलै २०२५: महाराष्ट्रातील उबर आणि ओला चालकांनी आपला संप तिसऱ्या दिवशीही सुरू ठेवल्यामुळे मुंबई विमानतळावरील आगमन आणि प्रस्थान सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ प्रवासाचे नियोजन करण्याचे आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे.

१५ जुलैपासून सुरू झालेल्या या संपामध्ये संपूर्ण राज्यातून आलेले हजारो ऑटो रिक्षा चालक, कॅब चालक आणि गिग कामगार सहभागी झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर या संपकऱ्यांनी आंदोलन छेडले असून, अ‍ॅप-आधारित कॅब सेवांवर वाहतूक विभागाने आवश्यक ती कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या आंदोलनाच्या मुख्य मागण्या म्हणजे उबर, ओला आणि रॅपिडो यासारख्या कंपन्यांवर अधिक कडक देखरेख ठेवणे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, बाईक टॅक्सी आणि काही खासगी वाहन प्रकारांवर बंदीच्या आदेश असूनही हे अ‍ॅप्स अजूनही बेकायदेशीररित्या सेवा देत आहेत. याशिवाय, त्यांनी ‘सर्ज प्रायसिंग’ मॉडेलवरही टीका केली असून, यामुळे चालक आणि प्रवासी दोघांचाही आर्थिक शोषण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी रॅपिडोची बाईक टॅक्सी सेवा थांबवली असल्याचा दावा केला असला तरी वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की ही सेवा अ‍ॅपवरून अजूनही उपलब्ध आहे, अगदी मंत्रालयाच्या परिसरातसुद्धा.

आंदोलकांनी केंद्रीय वाहतूक मंत्रालयावरही गंभीर आरोप केले असून, या अ‍ॅप-आधारित सेवा कंपन्यांना वाढीव दर आकारण्यास मोकळीक देण्यात आल्याने गिग वर्कर्सची स्थिरता धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या आंदोलनाचा तोडगा निघालेला नसल्याने, मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांना वाहतुकीच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याचे आणि आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune