बाभुळगाव तालुक्यातील यावली गावात व्यसनाधीन मुलाने फावड्याने आईचे भांडवल संपवले, आई पार्वता ठार, वडील महादेव गंभीर जखमी. फौजदारी कारवाई सुरू.
सायली मेमाणे
पुणे १८ जुलै २०२५ : बाभुळगाव (ता. यवतमाळ) येथील यावली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांवर फावड्याने हल्ला केला. यात आई पार्वता डेबूर (वय ६२) यांचा जागीच मृत्यू झाला असून वडील महादेव डेबूर (वय ६५) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार १३ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र डेबूर (वय ३५) याला दारूचे व्यसन असून तो अनेकदा घरात वाद निर्माण करत असे. त्याला भीती होती की त्याच्या आईवडिलांनी जुने घर त्यांच्या तीन मुलींच्या नावावर केले आहे. हीच गोष्ट त्याच्या रागाचा कारण बनली. दररोज दारू पिऊन येत आणि घर आपल्याच नावावर करायला आईवडिलांवर दबाव टाकत असे. या वादाला बुधवारी रात्री भयावह वळण लागले.
त्या दिवशी रात्री परत दारू पिऊन आलेल्या जितेंद्रने घरात पुन्हा वाद सुरु केला. वाद इतका वाढला की त्याने फावड्याने आई पार्वता आणि वडील महादेव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पार्वता यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडील महादेव डेबूर यांना देखील गंभीर इजा झाली आहे. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि जखमी महादेव यांना बाभुळगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथून पुढे यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी आरोपी जितेंद्रची पत्नी सुशीला डेबूर (वय ३०) ही घरात उपस्थित होती. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
डोक्यावर घातक वार झाल्याने पार्वता डेबूर यांचा जागीच मृत्यू झाला. एकीकडे पतीवर उपचार सुरू असून दुसरीकडे तिन्ही मुलींच्या डोळ्यांसमोर आपल्या आईचा जीव जाताना पाहण्याची वेळ आली. घरगुती कलह आणि व्यसनाधीनतेमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter