• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

वाघोलीत युवराज ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोडा; प्रवाशांवर हल्ला, रोख रक्कम लुटली

Jul 26, 2025
🔒 पुणे वाघोलीत आलिशान ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोडा; प्रवाशांना मारहाण, रोख रक्कम लंपास🔒 पुणे वाघोलीत आलिशान ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोडा; प्रवाशांना मारहाण, रोख रक्कम लंपास

पुणे वाघोलीत युवराज ट्रॅव्हल्सच्या आलिशान बसमध्ये चार अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. प्रवाशांवर मारहाण करत रोख रक्कम लुटली. पोलीस तपास सुरू.

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : पुणे शहराजवळील वाघोली परिसरात शनिवारी रात्री एका आलिशान खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोड्याची घटना घडली. यामध्ये चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवाशांवर व कर्मचार्‍यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे पुणे-नगर मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे.

ही घटना रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा युवराज ट्रॅव्हल्सची बस समृद्धी लॉजजवळ काही प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. याचवेळी चार अज्ञात इसमांनी सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमध्ये प्रवेश केला. काही क्षणातच त्यांनी आक्रमक होत प्रवाशांकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू मागणे सुरू केले. विरोध करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी मारहाण केली.

बसचालक भाऊसाहेब मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली व धमकावून त्यांच्याकडून ₹५,५०० रुपये लुटले. दुसऱ्या प्रवाशाने, हृषिकेश सानप, यांनी देखील मारहाण झाल्याची व रोख रक्कम हिसकावल्याची तक्रार केली आहे. बस कंडक्टर संतोष ठोकळ, जे बीड येथील रहिवासी आहेत, त्यांना मारहाण करत ₹२,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले गेले.

घटनास्थळी त्या वेळी वर्दळ असूनसुद्धा आरोपींनी वाहनातून अहमदनगरकडे (आताचे अहिल्याबाईनगर) पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वाघोली पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल.

या घटनेमुळे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बसमध्ये सुरक्षा यंत्रणा वाढवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune