• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

हैदराबादमध्ये लपलेला टिपु पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत कारवाई

Jul 26, 2025
हैदराबादमध्ये लपलेला टायगर पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत मोठी कारवाईहैदराबादमध्ये लपलेला टायगर पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत मोठी कारवाई

पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ने टिपु पठाण टोळीतील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैयाज गफार बागवान याला हैदराबाद येथून अटक केली. आरोपीवर MCOCAसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे २६ जुलै २०२५ : पुणे | गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने एक मोठी कामगिरी पार पाडत, मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८) याला तेलंगणाच्या हैद्राबाद येथून अटक केली आहे. आरोपी हा पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात पाहिजे होता आणि अनेक गंभीर कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज बागवान हा मूळचा खाजा मंजिल गल्ली क्र.१७ समोर, सय्यदनगर, हडपसर येथील रहिवासी आहे. मात्र अलीकडे तो हैद्राबादमधील प्रेमनगर, हाफीसपेठ येथे वास्तव्यास होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार नासेर देशमुख आणि राहुल ढमढेरे यांच्या पथकाने मियापुर पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले.

फैयाज बागवानविरुद्ध काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. १००/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१)(२), १९१(२) आणि ६१(२), १११ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) १९९९ चे कलम ३(१), ३(२), ३(४) अंतर्गत गंभीर आरोप आहेत.

सदर ऑपरेशनसाठी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. प्रमोद खरात, अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे आणि राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.

पुणे पोलिसांची ही कामगिरी संघटीत गुन्हेगारीविरोधातील कारवाईला चालना देणारी ठरत आहे. अशा प्रकारे परराज्यात लपलेले गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे ही पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune