दोस्तीचा दगाफटका! पुण्यातील अंबेगावमध्ये एक महिला मैत्रिणीने विश्वासघात करत थंड कॉफीत गुंगीचं औषध टाकून ₹5.46 लाखांचे दागिने चोरले. आरोपी मैत्रीण अटकेत!
दोस्तीचा दगाफटका: कॉफीत औषध टाकून साडेपाच लाखांचे दागिने चोरले
पुणे – अंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेने आपल्या जुनी मैत्रिणीवर विश्वासघात करत थंड कॉफीत गुंगीचं औषध टाकून तिच्या घरातून तब्बल ₹5.46 लाखांचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अभ्यासाची मैत्री… चोरीपर्यंत पोहचली!
ही दोघी महिलांची ओळख साडशिव पेठेतील अभ्यासक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर दोघींचं लग्न अंबेगाव बुद्रुक व अंबेगाव पठार येथे झाल्याने त्या एकमेकींच्या संपर्कात राहिल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला स्टॉक मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये रस होता. यामधून तिला मोठा आर्थिक फटका बसल्याने तिने मैत्रिणीच्या घरी चोरी करण्याचा कट रचला.
थंड कॉफीत औषध… आणि दागिने गायब!
6 मार्च रोजी दुपारी 4 वाजता आरोपी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिने बरोबर आणलेल्या थंड कॉफीत गुंगीचं औषध मिसळलं. कॉफी पिल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागल्यावर आरोपीने तिच्या कपाटातून साडेपाच लाखांचे दागिने लंपास केले.
काही दिवसांनी दागिने गायब असल्याचे लक्षात येताच पीडितेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत आरोपी महिलेला अंबेगाव पठार येथून अटक केली. कोर्टाने तिला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपास सुरू
पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा प्रकार मैत्रीच्या नावाखाली विश्वासघात आणि गुन्हेगारीचा गंभीर नमुना असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.