Nagpur GST विभागात दारूच्या पैशासाठी लिपिकाने फाईल्स विकल्या; विभागात खळबळ

0
Nagpur GST विभागात दारूच्या पैशासाठी लिपिकाने फाईल्स विकल्या; विभागात खळबळ

Nagpur GST विभागात दारूच्या पैशासाठी लिपिकाने फाईल्स विकल्या; विभागात खळबळ

Nagpur GST लिपिक मोहित गुंड याने दारूच्या पैशासाठी ऑफिसमधील सुमारे 100 किलो सरकारी फाईल्स भंगारात रद्दीच्या दराने विकल्या; सीसीटीव्ही फुटेजवरून उघड.

सायली मेमाणे

पुणे २९ जुलै २०२५ : नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील केंद्र सरकारच्या जीएसटी विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी कागदपत्रांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणात मोहित गुंड या लिपिकाने दारूच्या पैशांसाठी कार्यालयातील सुमारे 100 किलो वजनाच्या महत्त्वाच्या फाईल्स भंगारवाल्याला रद्दीच्या दराने केवळ 5 हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे.

मोहित गुंड याची नियुक्ती अनुकंपा तत्वावर इंदूरच्या CGST कार्यालयात झाली होती. मात्र, सततच्या गैरहजेरीमुळे आणि दारूच्या व्यसनामुळे त्याची बदली नागपूरच्या SGST कार्यालयात करण्यात आली होती. दरम्यान, त्याने नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमसमोरील CGST रेंज ऑफिसमधून फाईल्स रिक्षामधून नेऊन भंगारात विकल्या.

यामुळे नागपूरच्या सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच कार्यालयातील अधिकारी सतर्क झाले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या फुटेजमध्ये मोहित गुंड फाईल्स रिक्षामध्ये भरताना स्पष्टपणे दिसून आला. लगेच संबंधित भंगारवाल्याशी संपर्क साधून 5 हजार रुपये देऊन सर्व फाईल्स परत मिळवण्यात आल्या.

यानंतर मोहित गुंड याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून, सरकारी दस्तऐवजांच्या सुरक्षेबाबत मोठी बेपर्वाई दाखवल्याने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकरणामुळे एकूणच सरकारी कार्यालयातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे. सरकारी फाईल्स रद्दीत विकण्यासारख्या कृत्यामुळे केवळ विभागाचीच नव्हे, तर शासनाची प्रतिमा धुळीस मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *