Navi Mumbai Crime: बलात्कार, गर्भपात, धमक्या – उलवे व संभाजीनगरमध्ये दोन धक्कादायक प्रकरणे
बलात्कार, गर्भपात, धमक्या – उलवे व संभाजीनगरमध्ये दोन धक्कादायक प्रकरणे
नवी मुंबईतील उलवे आणि संभाजीनगरमध्ये दोन वेगवेगळ्या महिलांवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे खळबळजनक प्रकरण उघड. पनवेलच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघांवर गंभीर गुन्हे दाखल. तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : नवी मुंबईतील उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका ३९ वर्षीय व्यक्तीने तरुणीवर वारंवार बलात्कार केला, मारहाण केली, जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ७ महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कितीका ज्वेल्स इमारतीतील फ्लॅटमध्ये घडल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीचे नाव विशेष गयाप्रसाद वरुण असून तो मूळचा कानपूर, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीने पीडितेला १ जानेवारी २०२५ पासून २९ जुलै २०२५ पर्यंत अनेक वेळा आपल्या घरी बोलावून घेतले आणि वारंवार लैंगिक शोषण केले. पीडितेने सांगितले की या दरम्यान तिला शिवीगाळ, मारहाण, आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. या अमानवी अत्याचारातून पीडित महिला गर्भवती झाली असताना आरोपीने तिच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला. इतक्यावरच न थांबता, आरोपीने पोलिसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात उलवे पोलिसांनी विशेष गयाप्रसाद वरुण याच्याविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी अर्जुन रजाने यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ही घटना उघड झाल्यानंतर नवी मुंबईतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक संस्थांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांनी महिला सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा आणि कठोर कायदा अंमलबजावणीची गरज व्यक्त केली आहे.
नवी मुंबईसारख्या प्रगत शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासन आणि समाज यांच्यासमोर ही मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत. या घटनेमुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.