धोकादायक बसेसचा कहर: मीरा-भाईंदर परिवहन विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ?

0
धोकादायक बसेसचा कहर: मीरा-भाईंदर परिवहन विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ?

धोकादायक बसेसचा कहर: मीरा-भाईंदर परिवहन विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ?

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या बसगाड्यांची दुरवस्था उघड! धूर ओकणाऱ्या, तुटलेल्या दरवाज्यांच्या बसेस रस्त्यावर; प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

सायली मेमाणे

पुणे ३१ जुलै २०२५ : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बसेस सध्या अक्षरशः मृत्यूच्या सावटाखाली धावताना दिसत आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या या विभागाच्या बसेसची अवस्था इतकी बिकट आहे की, नागरिकांच्या जीवाशी सरळसरळ खेळ चालू आहे. काही बसगाड्या रस्त्यावर धूर ओकत धावताना दिसतात, काहींचे दरवाजे तुटलेले असून, प्रवाशांसाठी हे दरवाजे जीवघेणे ठरत आहेत. काही बसगाड्यांच्या पत्र्यांमध्ये गंज चढलेला असून, त्यांचा काही भाग सहजपणे तुटण्याच्या स्थितीत आहे. एवढंच नव्हे तर काही बसेसच्या आतील भागामध्ये खिळखिळेपणा इतका वाढलेला आहे की प्रवास करताना प्रत्येक थांब्यावर प्रवाशांना धडकी भरते.

या बसेसवर कोणतीही निगा राखली जात नसल्याचे स्पष्ट आहे. नागरिकांचे जीवन धोक्यात घालणाऱ्या या बसेसद्वारे प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. प्रवाशांकडून अनेक वेळा तक्रारी करूनही या बसेसना दुरुस्त करण्यात कोणतीही तत्परता प्रशासनाने दाखवलेली नाही. शिवाय या बसगाड्या शहरातील अतिवस्तीत व गर्दीच्या भागांत धावत असल्याने अपघाताचा धोका अनेकपटींनी वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. किती प्रवाशांचे प्राण गमावले गेल्यानंतर हे निष्काळजी धोरण थांबणार असा सवाल उपस्थित होतो आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून या गैरव्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *