₹500 मध्ये आश्रम, ₹50 मध्ये जेवण – कमी बजेटमध्ये ऋषिकेश ट्रिपचं परिपूर्ण नियोजन

0
₹500 मध्ये आश्रम, ₹50 मध्ये जेवण – कमी बजेटमध्ये ऋषिकेश ट्रिपचं परिपूर्ण नियोजन

₹500 मध्ये आश्रम, ₹50 मध्ये जेवण – कमी बजेटमध्ये ऋषिकेश ट्रिपचं परिपूर्ण नियोजन

कमीत कमी खर्चात ऋषिकेश फिरायचंय का? फक्त ₹500 मध्ये आश्रमात राहणी व ₹50 मध्ये छोले भटूरेसारखं चवदार जेवण! कमी बजेटमध्ये परिपूर्ण ट्रिप प्लॅन जाणून घ्या.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : सध्या हवामान आल्हाददायक असल्यामुळे अनेकजण प्रवासाचे नियोजन करत आहेत. पुढच्या आठवड्यात येणारी सलग सुट्टी हा वेळ आपल्या कुटुंबासोबत एखाद्या शांत, सुंदर ठिकाणी घालवण्याचा उत्तम योग आहे. अशा वेळी कमी बजेटमध्ये प्रवास करायचा विचार करत असाल, तर ऋषिकेश हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे. दिल्लीपासून अवघ्या 4-5 तासांवर असलेले ऋषिकेश हे निसर्ग, अध्यात्म आणि साहसाचं परिपूर्ण मिश्रण आहे. इथे राहणं, खाणं, फिरणं हे सर्व अत्यंत वाजवी दरात करता येतं.

ऋषिकेशमध्ये लक्ष्मण झुल्याजवळ स्वस्त आणि आरामदायक हॉस्टेल्स उपलब्ध आहेत. एका बेडसाठी दररोज फक्त ₹500 इतका खर्च येतो आणि त्यात गंगेच्या सुंदर दृश्याचा अनुभवही मिळतो. ‘गो स्टॉप्स’ हे हॉस्टेल फक्त ₹300 मध्ये राहण्याची सोय देतं, जे पतंजली योग केंद्र आणि झुल्याजवळ आहे. तसंच ‘हॉस्टलर’ हे देखील शांतता आणि डोंगरदऱ्यांच्या सानिध्यातील उत्तम ठिकाण आहे, जिथे एका खोलीचं भाडं फक्त ₹500 आहे.

ऋषिकेशमध्ये खाण्याचाही खर्च फारसा होत नाही. स्थानिक चव अनुभवायची असेल, तर त्रिवेणी घाट रोडवरील ‘हीराभाई’ ची छोले भटुरेची जुनी दुकान आणि पुष्कर मंदिर रोडवरील “गुरु कृपा छोले कुलचे” स्टॉल ही ठिकाणं अवश्य भेट द्यावीत. केवळ ₹50 मध्ये मिळणाऱ्या या पारंपरिक चविष्ट प्लेट्स प्रत्येक प्रवाशाचं मन जिंकतात.

ऋषिकेशमध्ये असंख्य मंदिरे, आश्रम आणि गंगेच्या काठावरचे योग केंद्रे आहेत. इथे आल्यावर मनाला शांतता मिळते. मात्र, पावसाळ्यात इथे जाणे टाळावे, कारण नदीचे पाणी आणि हवामान दोन्ही अनिश्चित असते.

कमी बजेटमध्ये निसर्गाच्या आणि अध्यात्माच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर ऋषिकेशपेक्षा उत्तम पर्याय नाही. अवघ्या ₹500 मध्ये राहणी आणि ₹50 मध्ये रुचकर जेवण – अशा प्रकारे नियोजन केल्यास ही सहल तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *