पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट; राजू पाटील यांचे प्रयत्न यशस्वी

0
पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट; राजू पाटील यांचे प्रयत्न यशस्वी

पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट; राजू पाटील यांचे प्रयत्न यशस्वी

पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत माजी आमदार राजू पाटील यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या मागणीनुसार आता व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश देण्यात आला आहे.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : कल्याणमधील शिळफाटा मार्गावरील देसाई-निळजे-काटई म्हणजेच पलावा उड्डाणपुलाचे काम सध्या निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण स्थितीत असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी 1 जून रोजी प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या बांधकामाची स्थिती आणि खराब गुणवत्ता याकडे लक्ष वेधले होते. त्यांनी पुलाच्या कामावर गंभीर शंका उपस्थित करत 3 जून रोजी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून व्हीजेटीआय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती.

या मागणीची शासनाने गंभीर दखल घेत 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अधिकृत आदेश काढले आहेत. आदेशानुसार संबंधित विभागाला व्हीजेटीआय संस्थेकडून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या निर्णयामुळे राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांची लोकहिताची आणि तांत्रिकदृष्ट्या सजग भूमिका योग्य ठरली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

या उड्डाणपुलाच्या कामात अवघ्या एका महिन्यात खड्डे दिसून येत असल्याचे निदर्शनास आले असून, हे स्पष्टपणे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे प्रतिक आहे, असा आरोपही पाटील यांनी केला होता. यापूर्वीदेखील त्यांनी कल्याण-शिळ रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर सुमारे 30 ठेकेदार पॅनेल बदलण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी घेतलेली समयसूचक आणि लोकहिताची भूमिका शासनाला जागृत करणारी ठरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *