नवीन दुहेरी रेल्वेमार्ग: लोणी-काळभोर-कोलवडी-वाघोळी मार्गे पुणे पोहोचणार झपाट्याने

नवीन दुहेरी रेल्वेमार्ग: लोणी-काळभोर-कोलवडी-वाघोळी मार्गे पुणे पोहोचणार झपाट्याने
पुणे शहराला लोणी-काळभोर-कोलवडी-वाघोळी मार्गे जोडणारा 98 किमीचा दुहेरी रेल्वेमार्ग; 12 नवीन स्थानके, 160 किमी/तास गती, फक्त दीड तासांत प्रवास शक्य.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑगस्ट २०२५ : पुणे आणि नगर यांना जलद व सुरक्षितरीत्या जोडणारं एक महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प उभी राहण्याच्या धाटणीवर आहे. रेल्वेमार्गाचा हा नवा मार्ग लोणी-काळभोर-कोलवडी-वाघोळी मार्गे सुरू केला जाणार आहे आणि 98 किमी लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने उपक्रम म्हणून सादर केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर 12 नवीन रेल्वे स्थानके उभारल्या जाणार आहेत. या मार्गामुळे पुणे ते नगर प्रवासाचा वेळ इतक्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, की तळेगाव किंवा अन्य आंतरप्रांतीय मार्गाची गरजच राहणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी हा मार्ग 160 किमी प्रति तास गतीने धावत आहे, ज्यामुळे प्रवासाची लांबी फक्त दिड तास इतकी राहील. सध्याचा साधा मार्ग बसने घेण्यास 3 ते 4 तास वाव जात आहेत.
हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून राबवला जाणार आहे आणि केंद्र व राज्य सरकार यांच्यात समान प्रमाणात सहभाग असेल. हे केवळ एक प्रवासी सुविधा नव्हे तर औद्योगिक व नागरी विकासाचे सशक्त साधन ठरेल. भविष्यातील रेल्वे विस्तारातील कामांमध्ये तळेगाव ते उरुळी व पुणे ते अहिल्यानगर या मार्गांचा समावेशही करण्यात येईल. भूमी अधिग्रहणासाठी हवेली, शिरूर, पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन लागणार असून, त्यात सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातुन असून, कमीत कमी हवेली मध्ये होणार आहे.
हा दुहेरी मार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर स्थानिकांचा जीवनमान सुधारेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि Pune–Nagaar प्रदेशामध्ये आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा विकसित होतील. 4 वर्षांचा उदात्त वेळ असल्याने, लवकरच यातून सकारात्मक बदल दिसण्याची अपेक्षा आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter