पुण्यात दिवसा सोन्याचे दुकान लुटणारे 3 आरोपी 24 तासांत पकडले – गुन्हे शाखा युनिट-4 ची यशस्वी कारवाई

0
पुणे: दिवसा सोन्याचे दुकान लुटणारे 3 आरोपी 24 तासांत पकडले – गुन्हे शाखा युनिट-4 ची यशस्वी कारवाई

पुणे: दिवसा सोन्याचे दुकान लुटणारे 3 आरोपी 24 तासांत पकडले – गुन्हे शाखा युनिट-4 ची यशस्वी कारवाई

पुण्यात चंदननगरमधील श्री आशापुरा ज्वेलर्स लुटप्रकरणातील 3 आरोपींना गुन्हे शाखा युनिट-4 ने 24 तासांत अटक केली. आरोपींकडून ज्युपिटर दुचाकी जप्त.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरात दिवसा सोन्याचे दुकान लुटण्याचा धाडसी प्रकार घडला आणि केवळ 24 तासांत गुन्हे शाखा युनिट-4 ने तिन्ही आरोपींना जेरबंद केले.
ही घटना 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता चंदननगरमधील साईनाथनगर येथे घडली. दुचाकीवर आलेल्या तिन्ही आरोपींनी श्री आशापुरा ज्वेलर्सच्या मालकाला हत्याराचा धाक दाखवून लूट केली. या प्रकरणात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बिलाल मस्जिदजवळ, इंदिरानगर, गुलटेकडी येथे थांबलेले असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी सनी राजू खांडेकर (24), अनिल परशुराम विसरे (26) आणि गणेश दादा लगस (37) या तिन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ग्रे रंगाची ज्युपिटर (MH-12-UG-9744) दुचाकी, किंमत अंदाजे ₹80,000, जप्त केली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट ४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा, पोलीस फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी, पोलीस हवालदार संजय आढारी, अमजद शेख, नागेशसिंग कुंवर, विनोद महाजन, तुषार खराडे, किशोर दुशिंग, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, वैभव रणपिसे, शरद झांजरे, सुभाष आवाड यांनी केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed