गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी लागू

0
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी लागू

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी लागू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टनांपेक्षा जड वाहनांच्या वाहतुकीवर 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्टदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ :मुंबई/गोवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. गणेशमूर्ती आगमन, गौरी गणपती विसर्जन तसेच परतीच्या प्रवासादरम्यान रस्त्यावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार ही वाहतूक बंदी लागू केली गेली आहे. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत वजनक्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जड वाहनांना प्रवास करण्यास बंदी असेल.

यामध्ये अवजड ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार असून सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. विशेषतः विसर्जनावेळी रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed