नालासोपाऱ्यात मॉब लिंचिंग: मित्राच्या प्रेयसीला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाची हत्या

0
नालासोपाऱ्यात मॉब लिंचिंग: मित्राच्या प्रेयसीला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाची हत्या

नालासोपाऱ्यात मॉब लिंचिंग: मित्राच्या प्रेयसीला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाची हत्या

मुंबई नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना. मित्राच्या प्रेयसीला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून प्रतीक वाघे (२४) याची मित्रांनीच मॉब लिंचिंग करून हत्या केली. मुख्य आरोपी भूषण पाटील हा व्यायाम पट्टू असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ :मुंबईजवळील नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव परिसरात रविवारी उशिरा रात्री धक्कादायक प्रकार घडला. इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून एका तरुणाला निर्दयीपणे मारहाण करून ठार मारण्यात आले आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढत चाललेली सोशल मीडियावरील वादांची भयानक परिणती समोर आली आहे.

मृत तरुणाचे नाव प्रतीक वाघे (वय २४) असे आहे. तो आपल्या काही मित्रांसोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीकने आपल्या मित्राच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित मित्रांनी प्रतीकवर प्रचंड राग काढला. या रागातून त्यांनी त्याला जमावाने मारहाण करत गंभीर जखमी केले. मारहाण इतकी भयानक होती की प्रतीकने घटनास्थळीच जीव गमावला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण पाटील हा व्यायामपट्टू असल्याचे समोर आले आहे. त्यानेच या हल्ल्याचे नेतृत्व केले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. भूषण आणि त्याचे साथीदारांनी प्रतीकला मारहाण करून ठार मारल्याची खात्री पोलिसांच्या तपासात झाली आहे. सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे. केवळ सोशल मीडियावरील वादातून तरुणाचे प्राण जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटना टाळण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती आणि सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे असे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मृतक प्रतीक वाघे हा आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याचे समजते. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील वादातून हत्या होणे ही गंभीर घटना असून यामुळे पुन्हा एकदा युवकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेने राज्यभरात धक्का बसला असून केवळ एका अश्लील मेसेजमुळे २४ वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, तरुणांमधील आक्रमकता आणि कायद्याची भीती न बाळगता होत असलेले असे कृत्य यामुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा देऊन समाजात धाक निर्माण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed