Ajit Pawar Plane Crash: DGCA अहवालावर अमोल मिटकरींचा संताप; ‘गांजा पिऊन रिपोर्ट बनवला’ म्हणत VSR वर कारवाईची मागणी

0
Ajit Pawar Plane Crash: DGCA अहवालावर अमोल मिटकरींचा संताप; ‘गांजा पिऊन रिपोर्ट बनवला’ म्हणत VSR वर कारवाईची मागणी

Ajit Pawar Plane Crash: DGCA अहवालावर अमोल मिटकरींचा संताप; ‘गांजा पिऊन रिपोर्ट बनवला’ म्हणत VSR वर कारवाईची मागणी

अजित पवार विमान अपघात प्रकरणी DGCA च्या २२ पानी प्राथमिक अहवालावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी संतापले. VSR कंपनीवर बंदी आणि रोहित सिंगच्या अटकेची मागणी.


पुणे ०२ मार्राच २०२६ : ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सादर करण्यात आलेल्या DGCA च्या प्राथमिक अहवालावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी Directorate General of Civil Aviation (DGCA) कडून २२ पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. मात्र या अहवालातील निष्कर्ष आणि उल्लेखांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अहवालावर कठोर शब्दांत टीका केली आहे. DGCA चा अहवाल अत्यंत सदोष असून त्यामध्ये ठिकाणांच्या उल्लेखात विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्याचा चुकीचा उल्लेख, तसेच विमान झाडाला धडकल्याचा संदर्भ याबाबत अहवालात स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले. “हा अहवाल दारू किंवा गांजा पिऊन बनवल्यासारखा वाटतो,” असा संतापजनक घणाघात मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात VSR कंपनीचा वादही तीव्र झाला आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या कथित व्हिडिओमध्ये VSR चा मालक रोहित सिंग हा पायलटच्या सीटवर डुलकी घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत मिटकरी यांनी रोहित सिंगविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रोहित सिंग उड्डाणादरम्यान झोप घेत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, अशा व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली. तसेच संबंधित VSR कंपनीवर बंदी घालावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “जर रोहित सिंग मुजोर आणि माजोरडा असेल, तर त्याला तात्काळ अटक केलीच पाहिजे,” असे ते म्हणाले.

या प्रकरणात जय पवार यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. DGCA ने तातडीने कठोर कारवाई न केल्यास संबंधित कंपनीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. विमान सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरुवातीपासूनच विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. प्राथमिक अहवालानंतर त्या शंकांना आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे.

सध्या DGCA च्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणात आणखी कोणते खुलासे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed