BMC Affordable Homes: मुंबईत 426 घरांसाठी लॉटरी, किंमत आणि लोकेशनची संपूर्ण माहिती

0
मुंबईत 426 घरांसाठी लॉटरी, किंमत आणि लोकेशनची संपूर्ण माहिती

मुंबईत 426 घरांसाठी लॉटरी, किंमत आणि लोकेशनची संपूर्ण माहिती

मुंबई महापालिका (BMC) 426 घरांसाठी लॉटरी आयोजित करणार आहे. LIG आणि EWS गटातील नागरिकांसाठी उपलब्ध, किंमत 60 लाख ते 1 कोटी, लोकेशन्समध्ये भांडुप, जोगेश्वरी, कांदिवली आणि अंधेरी समाविष्ट.

सायली मेमाणे

पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : मुंबई महापालिका (BMC) म्हाडा आणि सिडकोसारखीच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी आयोजित करणार आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील बदलांमुळे 20 टक्के प्रीमियमच्या बदल्यात विकासकांकडून महापालिकेला 426 घरे मिळाली आहेत. ही घरे अल्प उत्पन्न गट (LIG) आणि अत्यल्प उत्पन्न गट (EWS) मध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

घरांचा आकार 270 चौरस फूट ते 528 चौरस फूटपर्यंत असेल. किंमत 60 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपये पर्यंत असणार आहे. महापालिकेने लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले असून, या घरांच्या विक्रीतून 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत, तर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आहे. या दोन्ही गटातील नागरिक या घरांसाठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक नागरिक महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा जाहीरातीतून माहिती घेऊ शकतील.

मुंबईतील ही 426 घरे विविध भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम, दहिसर पश्चिम, भायखळा पश्चिम, कांदिवली पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व, कांजुरमार्ग आणि भांडुप पश्चिम या ठिकाणी ही घरे आहेत. उपलब्ध घरांपैकी 270 घरे भांडुप पश्चिममध्ये असून, उर्वरित 186 घरे इतर भागात आहेत. भायखळा येथील घरे आकाराने लहान असूनही त्यांची किंमत जास्त आहे, तर उपनगरांतील घरे मोठी असून त्यांची किंमत तुलनेत कमी आहे.

म्हाडाप्रमाणेच BMC लॉटरीमध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी आणि काही विशेष गटांसाठी राखीव कोटा ठेवणार आहे. आगामी काही महिन्यांत महापालिकेला विकासकांकडून आणखी घरांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईकरांना पुन्हा संधी मिळू शकेल. या लॉटरीच्या माध्यमातून मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी घर मिळविण्याची संधी मिळणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed