BMC Election 2026: भाजप 128 जागांवर लढणार, उमेदवार यादी अंतिम टप्प्यात; एबी फॉर्म वाटप सुरू

0
BMC Election 2026: भाजप 128 जागांवर लढणार, उमेदवार यादी अंतिम टप्प्यात; एबी फॉर्म वाटप सुरू

BMC Election 2026: भाजप 128 जागांवर लढणार, उमेदवार यादी अंतिम टप्प्यात; एबी फॉर्म वाटप सुरू

मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी भाजप 128 जागांवर उमेदवार उतरवणार आहे. एबी फॉर्मचे वाटप सुरू असून उमेदवार यादी जाहीर करण्यास उशीर का? वाचा सविस्तर.

पुणे २९ डिसेंबर २०२५ : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पक्षाने मोठी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत भाजप तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक असतानाही पक्षाकडून संपूर्ण उमेदवार यादी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी आणि अंतर्गत नाराजी रोखण्यासाठी ही रणनीती जाणीवपूर्वक राबवली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपने निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत. पक्ष नेतृत्वाकडून ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशा उमेदवारांना टप्प्याटप्प्याने बोलावून अधिकृत फॉर्म दिले जात आहेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराजी, बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारी टाळण्यासाठी संबंधित आमदार आणि पक्ष निरीक्षकांवर मनधरणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने या निवडणुकीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. ज्या प्रभागांमध्ये अंतर्गत स्पर्धा अधिक आहे, तिथे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाराज इच्छुकांना दुसरा पर्याय शोधण्यास वेळ मिळणार नाही, हा पक्षाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, भाजपकडून काही उमेदवारांची नावे समोर आली असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामध्ये नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक 107, तेजिंदर सिंग तिवाना यांना वॉर्ड क्रमांक 47, नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 आणि संतोष ढाले यांना वॉर्ड क्रमांक 215 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9, तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2, स्नेहल तेंडुलकर वॉर्ड क्रमांक 218, अजय पाटील वॉर्ड क्रमांक 214 आणि सन्नी सानप वॉर्ड क्रमांक 219 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

या निवडणुकीत भाजपकडून अनुभवी नगरसेवकांसोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत असलेल्या प्रभागांमध्ये पक्ष आत्मविश्वासाने मैदानात उतरल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून प्रत्येक जागेवर बारकाईने गणिते मांडली जात आहेत.

आगामी काही तासांत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर निवडणूक प्रचाराला पूर्ण वेग येईल. भाजपची अंतिम उमेदवार यादी कोणते राजकीय संकेत देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *