Diva Station Fast Local Train: सप्टेंबरपासून दिवा स्थानकात थांबणाऱ्या जलद लोकल्स वाढणार; प्रवाशांमध्ये नाराजी

0
सप्टेंबरपासून दिवा स्थानकात थांबणाऱ्या जलद लोकल्स वाढणार; प्रवाशांमध्ये नाराजी

सप्टेंबरपासून दिवा स्थानकात थांबणाऱ्या जलद लोकल्स वाढणार; प्रवाशांमध्ये नाराजी

सप्टेंबरपासून दिवा रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनची संख्या वाढणार आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर निर्णय, मात्र इतर प्रवासी नाराज.

सायली मेमाणे

पुणे ३१ जुलै २०२५ : मुंबई – मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात महत्त्वाच्या दिवा रेल्वे स्थानकासाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने घोषणा केली आहे की सप्टेंबरपासून दिवा स्थानकात थांबणाऱ्या फास्ट लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल. यापूर्वी आंदोलन करणाऱ्या दिवावासीय प्रवाशांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी जूनमध्ये मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात काही प्रवासी धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर दिवा स्थानकाबाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन छेडले. त्यांनी “दिव्याला सगळ्या फास्ट ट्रेनचा थांबा द्या”, “पनवेल-दिवा लोकल सुरू करा”, तसेच “दिवा व मुंब्रा स्थानकांवर रुग्णवाहिका सेवा सुरू करा” अशा मागण्या मांडल्या.

दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि टिटवाळा येथून निघणाऱ्या काही फास्ट लोकल्सना दिवा स्थानकात थांबा दिला जाणार आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. नवीन वेळापत्रक सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असून, त्यात या बदलांचा समावेश असणार आहे. याशिवाय इतर मागण्यांबाबतही रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दिव्याला थांबणाऱ्या फास्ट ट्रेनमुळे इतर प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यांचं म्हणणं आहे की, लांबच्या लोकल ट्रेनना दिव्याला थांबा दिल्यास, ठाणे किंवा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे प्रवेश करणे कठीण होईल. यामुळे वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो.

रेल्वे प्रवक्त्यांच्या मते, “दिवा येथे जलद ट्रेन थांबवल्यास, सहा क्रॉसओव्हर ओलांडावे लागतात आणि त्यामुळे 12 मिनिटांचा वेळ वाया जाईल, जो संपूर्ण नेटवर्कवर परिणाम करू शकतो.”

मुंबईतील लोकल प्रवासाचे नियोजन करताना प्रत्येक बदलाकडे सावधगिरीने पाहावे लागते. दिवा स्थानकासाठी हा निर्णय सकारात्मक असला तरी त्याचे परिणाम संपूर्ण उपनगरीय प्रणालीवर जाणवतील, हे नक्की.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed