Diwali Special Train 2025: नागपूरकरांसाठी दसरा-दिवाळी अतिरिक्त ट्रेन सेवा

0
नागपूरकरांसाठी दसरा-दिवाळी अतिरिक्त ट्रेन सेवा

नागपूरकरांसाठी दसरा-दिवाळी अतिरिक्त ट्रेन सेवा

रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळीसाठी नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गावर विशेष ट्रेन सेवा सुरू केली. तिकीट, वेळ आणि थांबे याची संपूर्ण माहिती येथे.

सायली मेमाणे

पुणे ८ सप्टेंबर २०२५ : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागपूरकरांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष सोय केली आहे. सणासुदीमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते, विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान. या काळात प्रवाशांना तिकीट मिळण्यास अडचणी येतात आणि प्रवासात गैरसोय होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूरकरांसाठी दसरा-दिवाळी विशेष ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूरसाठी पुणे आणि मुंबईहून प्रत्येकी 20 अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. नागपूर-पुणे मार्गावर गाडी क्रमांक 01209 नागपूर ते पुणे विशेष ट्रेन 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान दर शनिवारी नागपूरहून सकाळी 11:40 वाजता सुटेल. या मार्गावर ही गाडी उरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर (अहमदनगर), बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशन्सवर थांबेल. पुणे ते नागपूर ही गाडी क्रमांक 01210 दर रविवारी दुपारी 3:50 वाजता पुणेहून सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर मार्गावर देखील विशेष स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. गाडी क्रमांक 02139 लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दर गुरुवारी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत धावेल. ही गाडी मुंबईमधून दुपारी 12:25 वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल. नागपूरहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी क्रमांक 02140 ट्रेन दर शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता निघेल.

या विशेष ट्रेन सेवा सुरू केल्यामुळे नागपूरकरांना दसरा-दिवाळी आपल्या मूळ गावी सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची संधी मिळणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आधीच तयारी ठेवण्याची शिफारस केली जात आहे कारण या सणासुदीच्या काळात प्रवासी संख्येमुळे तिकीट लगेच संपण्याची शक्यता असते.

रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की या विशेष ट्रेन सेवांमुळे नागपूर आणि मुंबई, पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल. सणाच्या काळात वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे.

याशिवाय, प्रवाशांनी या विशेष ट्रेनच्या वेळापत्रकानुसार योग्य वेळेवर स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. नागपूरकरांसाठी रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय सणासुदीला घरच्या वातावरणात साजरा करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. या विशेष ट्रेन सेवेमुळे प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर होणार असल्याची खात्री आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *