Electricity Bill Reduction: वीज बिल कमी करण्यासाठी ‘या’ स्मार्ट टिप्स फॉलो करा, महिनाभरात दिसेल फरक
Electricity Bill Reduction: वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा, महिनाभरात दिसेल फरकElectricity Bill Reduction: वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा, महिनाभरात दिसेल फरक
वीज बिल जास्त येतंय? पंखे, लाईट्स, एसी आणि उपकरणांच्या वापरात काही छोटे बदल करून दरमहा 100 युनिट्सपर्यंत वीज वाचवा आणि 1000 रुपयांहून अधिक बचत करा.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ : सध्या वाढत्या वीज दरामुळे अनेक घरांमध्ये विजेचं बिल प्रचंड वाढले आहे. विशेषतः जिथे अतिरिक्त 100 युनिट्सच्या वापरानंतर दरही वाढतो, तिथे थोडा जरी जास्त वापर झाला तरी महिन्याचे बिल हजारोंमध्ये पोहोचते. मात्र काही स्मार्ट आणि सोप्या टीप्स वापरल्यास तुम्ही सहजपणे हे आर्थिक ओझं कमी करू शकता आणि विजेची मोठी बचत करू शकता.
घरातील जुने सीलिंग फॅन हे सर्वाधिक वीज खाणारे उपकरण असते. उदाहरणार्थ, 80 वॅटचा एक जुना फॅन जर दिवसाला 20 तास चालत असेल, तर महिन्याला जवळपास 48 युनिट वीज वापरतो. जर तुम्ही अशा तीन पंख्यांचा वापर करत असाल आणि त्यांना नवीन, ऊर्जा कार्यक्षम मॉडेल्सने बदलले, तर महिन्याला सुमारे 87 युनिट्सची बचत शक्य आहे. अशा प्रकारे काही महिन्यांत नवीन पंख्यांचा खर्चही वसूल होतो.
याशिवाय, लाइटिंग सिस्टीममध्ये सुधारणा केल्यासही वीज बचतीत मोठी मदत होते. 40 वॅटच्या ट्यूब लाइट्सच्या जागी 18 वॅटच्या एलईडी दिव्यांचा वापर केल्यास आणि ते दररोज 10 तास वापरले, तर महिन्याला 26 युनिट्सची बचत होते. पाण्याच्या मोटरची वेळोवेळी देखभाल करणे, गळती दुरुस्त करणे यामुळेही 10 युनिटपर्यंत बचत होते.
एसीसारख्या जड उपकरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यास वीज वापर वाढतो. त्यामुळे एसीचे कंडेन्सर कॉइल्स दर 15 दिवसांनी स्वच्छ करणे, तापमान 24 डिग्रीवर ठेवणे आणि जुन्या स्टेबलायझरचा वापर टाळणे या गोष्टींचा अवलंब केल्यास 30 ते 45 युनिट्सची बचत होते.
तसेच, वापरत नसतानाही अनेक उपकरणे विजेचा वापर करत राहतात. उदा. मोबाइल चार्जर, सेट-टॉप बॉक्स, टीव्ही इत्यादी. हे उपकरणे वापरून झाल्यावर प्लग पूर्णपणे बंद केल्यास महिन्याला 5 ते 10 युनिट्सची बचत होऊ शकते.
वीज विभागाकडून वेळोवेळी वीज ऑडिट करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरामधील जास्त वीज खाणारी उपकरणे ओळखता येतात आणि अनावश्यक खर्च टाळता येतो.
एकूणच, पंखे, लाइट्स, एसी आणि इतर उपकरणांमध्ये काही साधे बदल केल्यास तुम्ही दरमहा 100 युनिट्सपेक्षा अधिक वीज वाचवू शकता, ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत मिळू शकते. या स्मार्ट सवयी लावल्यास केवळ आर्थिक फायदा नाही, तर पर्यावरण पूरक जीवनशैलीकडे एक सकारात्मक पाऊल ठरेल.