HDFC Bank News: एचडीएफसी बँकेचे नवे नियम जाहीर; कर्जदर कमी, FD व्याज वाढले तर ATM-UPI व्यवहार महाग

0
HDFC Bank News: एचडीएफसी बँकेचे नवे नियम जाहीर; कर्जदर कमी, FD व्याज वाढले तर ATM-UPI व्यवहार महाग

HDFC Bank News: एचडीएफसी बँकेचे नवे नियम जाहीर; कर्जदर कमी, FD व्याज वाढले तर ATM-UPI व्यवहार महाग

HDFC Bank Update: एचडीएफसी बँकेने MCLR दरात कपात करून EMI कमी करण्याची घोषणा केली आहे. FD व्याजदर वाढवले असून 1 एप्रिल 2026 पासून ATM-UPI कॅश विथड्रॉवर शुल्क आकारले जाणार आहे.


पुणे १२ मार्च २०२६ : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक बदल जाहीर केले आहेत. या नव्या नियमांमध्ये कर्जाचे व्याजदर, मुदत ठेव (FD) व्याजदर, एटीएम व्यवहार तसेच लॉकर शुल्क यामध्ये बदल करण्यात आले आहेत. काही नियम 7 मार्च 2026 पासून लागू झाले असून काही बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत.

एचडीएफसी बँकेने सर्वप्रथम कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंट्सपर्यंत कपात केली आहे. यामुळे ज्यांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे अशा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे त्यांच्या मासिक हप्त्यात म्हणजेच EMI मध्ये काही प्रमाणात घट होणार आहे.

नवीन दरानुसार ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.15 टक्के ठेवण्यात आला आहे, जो पूर्वी 8.25 टक्के होता. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा दर 8.25 टक्के आहे. तर सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR दर 8.35 टक्के ठेवण्यात आला आहे. हे दर 7 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत.

याचबरोबर बँकेने मुदत ठेवांवर म्हणजेच FD वर गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठीही आनंदाची बातमी दिली आहे. एचडीएफसी बँकेने काही कालावधीसाठी FD वर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. तीन वर्षे एक दिवस ते चार वर्षे सात महिने या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आता 6.50 टक्के व्याज मिळणार आहे, जे यापूर्वी 6.40 टक्के होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 6.90 टक्के होता. सध्या बँकेचे इतर FD व्याजदर 2.75 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत आहेत.

दरम्यान, बँकेने एटीएम व्यवहारांबाबतही महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. हा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार एटीएममधून यूपीआयद्वारे पैसे काढणे म्हणजेच कॅशलेस विथड्रॉवल आता मोफत मासिक व्यवहारांच्या मर्यादेत समाविष्ट केले जाणार आहे. याचा अर्थ असा की, ग्राहकांनी त्यांच्या मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी शुल्क भरावे लागेल.

मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून यूपीआयद्वारे पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये आणि त्यावर लागू होणारा कर आकारला जाईल. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम वापरताना आपल्या मोफत व्यवहारांची मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

एचडीएफसी बँकेने लॉकर शुल्कातही काही बदल केले आहेत. बँकेने ‘Metro Plus’ नावाची नवीन लॉकर श्रेणी सुरू केली आहे. लॉकरचे भाडे आता लॉकरच्या आकारावर तसेच शाखेच्या स्थानावर अवलंबून असेल. या शुल्कावर वेगळ्या स्वरूपात जीएसटी आकारला जाणार आहे.

या सर्व बदलांमुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना काही बाबतीत फायदा तर काही बाबतीत अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांनी नवीन नियम समजून घेऊन त्यानुसार आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *