HSRP नंबरप्लेट अंतिम तारीख 15 ऑगस्ट; न बसवल्यास ₹10,000 दंडाची शक्यता, महाराष्ट्रात अजून 70% वाहनं बाकी

0
HSRP नंबरप्लेट अंतिम तारीख 15 ऑगस्ट; न बसवल्यास ₹10,000 दंडाची शक्यता, महाराष्ट्रात अजून 70% वाहनं बाकी

HSRP नंबरप्लेट अंतिम तारीख 15 ऑगस्ट; न बसवल्यास ₹10,000 दंडाची शक्यता, महाराष्ट्रात अजून 70% वाहनं बाकी

महाराष्ट्रात 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबरप्लेट 15 ऑगस्ट 2025 पर्यंत बसवणे बंधनकारक. नियम मोडल्यास ₹10,000 पर्यंत दंड. सध्या फक्त 19.57% वाहनांवरच प्लेट्स बसवल्या गेल्या आहेत.

सायली मेमाणे

पुणे १४ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्रात 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असून त्यासाठीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 रोजी संपत आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील फक्त 19.57% वाहनांवरच या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित वाहनधारकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना ₹10,000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा 33% बसवणीसह आघाडीवर असून वर्धा, नागपूर ग्रामीण, सातारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा क्रमांक त्यानंतर लागतो.

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य केले असून, 1 जानेवारी 2025 पासून ही मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली असली तरी नागरिकांचा प्रतिसाद कमी आहे. अनेक वाहनधारक तांत्रिक अडचणींमुळे व प्रक्रियेतील किचकटपणामुळे प्लेट्स बसवण्यात मागे आहेत. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनजागृती वाढवण्यासह फिटमेंट सेंटरची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

HSRP मिळवण्यासाठी वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून वाहनाचा RC क्रमांक, जवळचे फिटमेंट सेंटर निवडणे, शुल्क भरणे आणि अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. ठरलेल्या दिवशी केंद्रावर जाऊन प्लेट्स बसवून घेणे बंधनकारक आहे. ज्या वाहनधारकांनी मुदतीपूर्वी नोंदणी केली असून 15 ऑगस्टनंतरची अपॉइंटमेंट मिळाली आहे, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तथापि, उर्वरित सुमारे 70% वाहनधारकांनी तत्काळ कारवाई न केल्यास दंडाची कारवाई निश्चित आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed