Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण लोकसभेत सादर करणार नवे इन्कम टॅक्स विधेयक, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

0
Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण लोकसभेत सादर करणार नवे इन्कम टॅक्स विधेयक, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण लोकसभेत सादर करणार नवे इन्कम टॅक्स विधेयक, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

Income Tax Bill 2025 आज लोकसभेत सादर होणार. 1961 च्या आयकर कायद्याची जागा घेणारे हे नवे विधेयक भाषेतील सुलभता, कर परतावा, NIL TDS प्रमाणपत्र अशा महत्त्वाच्या बदलांसह येणार आहे.

सायली मेमाणे

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत नवीन आयकर विधेयक 2025 सादर करणार आहेत. हे विधेयक 1961 च्या विद्यमान आयकर कायद्याची जागा घेईल. गेल्या आठवड्यात हे विधेयक मांडले गेले होते, मात्र सभागृह तहकूब झाल्यामुळे ते मागे घेण्यात आले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सुधारित विधेयक पूर्णपणे नवीन असेल आणि जुन्या मसुद्यापेक्षा वेगळे असेल.

लोकसभा निवड समितीने प्राप्तिकर विधेयकावर 285 सूचना केल्या होत्या, ज्यातील महत्त्वाच्या सूचनांचा समावेश या नव्या आवृत्तीत केला गेला आहे. बदलांमध्ये कायद्याची भाषा सोपी करणे, मसुद्याची स्पष्टता, वाक्यरचना सुधारणा आणि क्रॉस रेफरन्सिंगची अचूकता यांचा समावेश आहे. पॅनेलने केलेल्या प्रमुख शिफारसींपैकी काही महत्त्वाच्या म्हणजे, वेळेत रिटर्न न भरल्यास कर परतावा न मिळण्याची अट काढून टाकणे, आंतर-कॉर्पोरेट लाभांश तरतूद पुन्हा समाविष्ट करणे आणि करदात्यांना NIL TDS प्रमाणपत्राची सुविधा देणे.

या विधेयकाकडे उद्योग, करतज्ञ आणि सामान्य करदाते सर्वांचेच लक्ष लागले आहे, कारण हे नवीन स्वरूपाचे कायदे करप्रक्रिया अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्यास मदत करू शकतात.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed