Jilha Parishad Election 2026: राज्यातील कोणकोणत्या 15 जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी सज्ज? पाहा A ते Z यादी

0
Jilha Parishad Election 2026: राज्यातील कोणकोणत्या 15 जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी सज्ज? पाहा A ते Z यादी

Jilha Parishad Election 2026: राज्यातील कोणकोणत्या 15 जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी सज्ज? पाहा A ते Z यादी


महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. राज्यातील १५ जिल्हा परिषदा, मतदान केंद्रांची संख्या आणि संपूर्ण माहिती येथे वाचा.

पुणे १३ जानेवारी २०२६ : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच ग्रामीण भागातही निवडणुकीचा रंग चढणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणुकीत राज्यातील एकूण १५ जिल्हा परिषदांचा समावेश आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होईल. तर संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक पार पडणार आहे. यासोबतच राज्यभरात १२५ पंचायत समित्यांचीही निवडणूक घेतली जाणार आहे.

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी तर दुसरे मत पंचायत समितीसाठी दिले जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमच्या माध्यमातून पार पडणार आहे. राज्यात एकूण २५ हजार ४८२ मतदान केंद्रे असणार असून त्यासाठी ५५ हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. काही ठिकाणी महिलांसाठी विशेष ‘पिंक मतदान केंद्रे’ही उभारण्यात येणार आहेत.

निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी जागा राखीव आहेत, त्या ठिकाणी उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द केली जाणार आहे. या नियमांमुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही काळजीपूर्वक तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण भागातही राजकीय हालचालींना वेग येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार असल्याचे मानले जात असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed