KDMC MIDC निवासींमध्ये कचरा संकलन विस्कळीत; रहिवाशांचा रोष वाढतोय

0
KDMC MIDC निवासींमध्ये कचरा संकलन विस्कळीत; रहिवाशांचा रोष वाढतोय

KDMC MIDC निवासींमध्ये कचरा संकलन विस्कळीत; रहिवाशांचा रोष वाढतोय

कल्याण डोंबिवली MIDC परिसरातील निवासींमध्ये घरगुती कचरा वेळेवर न उचलल्याने अस्वच्छता आणि आरोग्य समस्या निर्माण; रहिवाशांनी तक्रार केली.


सायली मेमाणे

पुणे २६ ऑक्टोबर २०२५ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) MIDC परिसरातील निवासींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचरा संकलनाची समस्या भयंकर ठरली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या नियमित किंवा वेळेवर येत नाहीत. काही ठिकाणी तर सलग दोन-तीन दिवस घरगुती कचरा गोळा करण्यासाठी गाड्या आल्या नाहीत, ज्यामुळे रहिवाशांचे राग, रोष समाज माध्यमांवर प्रकट झाला. मात्र प्रशासन किंवा राजकीय नेते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी आरोप केले आहे.

सध्या परिसरात कचरा उचलण्यासाठी एका खाजगी ठेकेदाराला कंत्राट दिले आहे. मात्र त्यांच्या कडे अपुऱ्या घंटागाड्या आणि अपुरे कर्मचारी असल्यामुळे कचरा नियमित उचलला जात नाही. उघड्यावर घरगुती कचरा आणि ओला-शुष्क कचरा एकत्र करत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. रस्त्यांवर झाडांचा पालापाचोळा आणि इतर कचरा आधीच जमा असताना, घरगुती कचऱ्यामुळे रोगराईचा धोका वाढला आहे आणि आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

मिलापनगरमधील ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी KDMC आयुक्त अभिनव गोयल यांना ईमेल करून परिस्थितीची तक्रार केली आहे. तसेच काही नागरिकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन तक्रारी करण्याचा विचार व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून यावर तातडीची कारवाई न झाल्यामुळे रहिवाशांचा संताप वाढला आहे.

परिस्थिती गंभीर असून दिवाळीच्या सणाच्या काळात वीज आणि पाणी पुरवठा देखील अनेकदा खंडित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे निवासी भागातील लोक विटल्याचे संकेत देत आहेत आणि काहीजण प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनीही याबाबत स्थानिक प्रशासनाला सावध केले आहे.

आरोग्याच्या दृष्टीनेही ही समस्या गंभीर ठरत आहे. घरगुती कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरातील निवासींमध्ये संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला आहे. रहिवाशांनी म्हटले की, कर्मचारी नसणे किंवा अपुऱ्या सुविधांमुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो आहे. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही प्रशासन किंवा राजकारणी यांची दुर्लक्ष केलेली भूमिका चिंताजनक आहे.

परिसरातील रहिवाशांची मागणी आहे की, कचरा व्यवस्थापनावर तातडीने लक्ष दिले जावे. पर्याप्त घंटागाड्या आणि कर्मचारी उपलब्ध करून, नियमित कचरा संकलन सुरू करावे. तसेच नागरिकांना आरोग्य आणि स्वच्छतेसंबंधी उपाययोजना राबवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि महापालिकेने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “कचरा उचलण्यात त्वरित सुधारणा न झाल्यास मोठे आंदोलन होऊ शकते. नागरिकांचा रोष वाढला आहे, आणि प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे.” या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन KDMC कडून कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने योजना राबवणे आवश्यक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed