KVS-NVS Mega Recruitment 2025: तब्बल 14,967 पदांची भरती सुरू; TGT-PRT-PGT आणि नॉन-टीचिंग पदांसाठी सुवर्णसंधी

0
KVS-NVS Mega Recruitment 2025: तब्बल 14,967 पदांची भरती सुरू; TGT-PRT-PGT आणि नॉन-टीचिंग पदांसाठी सुवर्णसंधी

KVS-NVS Mega Recruitment 2025: तब्बल 14,967 पदांची भरती सुरू; TGT-PRT-PGT आणि नॉन-टीचिंग पदांसाठी सुवर्णसंधी

KVS आणि NVS मध्ये मिळून 14,967 पदांची मोठी भरती सुरू. TGT, PGT, PRT, प्रिंसिपल आणि नॉन-टीचिंग पदांसाठी ऑनलाईन अर्ज 14 नोव्हेंबरपासून; अंतिम तारीख 4 डिसेंबर 2025.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ केंद्रीय विद्यालय (KVS) आणि नवोदय विद्यालय (NVS) मध्ये सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी या वर्षी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. CBSEने जाहीर केलेल्या ताज्या नोटिफिकेशननुसार दोन्ही संस्थांमध्ये मिळून तब्बल 14,967 पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शॉर्ट नोटिफिकेशननंतर आता डिटेल नोटिफिकेशनही जाहीर झाले असून 14 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार CBSEच्या www.cbse.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया टीचिंग आणि नॉन-टीचिंग अशा दोन्ही विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर आहे. KVS मध्ये PGT चे 1465, TGT चे 2794, PRT चे 3365 पदे भरली जाणार आहेत. तर NVS मध्ये PGT साठी 1513, TGT साठी 2978 पदे आणि तिसऱ्या भाषेतील TGT साठी 443 पदांची विशेष भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच दोन्ही संस्थांमध्ये प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल आणि असिस्टंट कमिश्नर यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी भरती होणार आहे. नॉन-टीचिंग क्षेत्रात KVS मध्ये 1155 आणि NVS मध्ये 787 पदांसाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत.

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. असिस्टंट कमिश्नर पदासाठी मास्टर्स पदवी, बीएड आणि किमान 50 टक्के गुण अपेक्षित आहेत. प्रिंसिपल आणि वाइस प्रिंसिपलसाठी मास्टर्स, बीएडसोबत 9 ते 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. TGT पदांसाठी संबंधित विषयातील पदवी, बीएड आणि CTET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. PRT साठी 12वी किंवा पदवी, D.El.Ed किंवा B.Ed आणि CTET आवश्यक आहे. नॉन-टीचिंग पदांसाठी 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी या पात्रता लागू आहेत.

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम CBSEच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि निर्धारित शुल्क भरून अर्ज सबमिट करावा. या भरतीसाठी अर्ज शुल्क पदनिहाय वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल आणि असिस्टंट कमिश्नर पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि EWS प्रवर्गाला ₹2800 तर SC/ST/PwD/ESM प्रवर्गाला ₹500 शुल्क लागणार आहे.

PGT, TGT, PRT तसेच इतर अधिकारी पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे शुल्क ₹2000 आणि राखीव प्रवर्गाचे शुल्क ₹500 आहे. JSA, स्टेनो, SSA, लॅब अटेंडंट आणि MTS पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गाला ₹1700 तर SC/ST/PwD/ESM प्रवर्गाला ₹500 शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. या भरतीमुळे देशभरातील प्रतिभावान शिक्षक आणि प्रशासनिक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यालयांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी KVS आणि NVS ची ही मेगा भरती मोठी संधी मानली जात असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed