Life Certificate Camp 2025: पेन्शनधारकांसाठी हयातीच्या दाखल्याची विशेष शिबिरे; कसा घ्याल लाभ?
Life Certificate Camp 2025: पेन्शनधारकांसाठी हयातीच्या दाखल्याची विशेष शिबिरे; कसा घ्याल लाभ?
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला आवश्यक. 1 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान देशभर 2500+ ठिकाणी Life Certificate शिबिरे आयोजित. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धती जाणून घ्या.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ :पेन्शनधारकांना दरवर्षी आपला हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करणे बंधनकारक आहे, जेणेकरून निवृत्तीवेतन सुरळीतपणे सुरू राहील. यासाठी केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 4 थी राष्ट्रव्यापी डिजिटल हयातीचा दाखला मोहीम जाहीर केली आहे. देशातील 1850 हून अधिक ठिकाणी, तसेच 2500 पेक्षा जास्त शिबिरांमधून पेन्शनधारकांना हा दाखला सादर करता येईल.
मागील वर्षी झालेल्या मोहिमेत 1.62 कोटी हयातीचे दाखले सादर झाले होते, तर यावर्षी ही संख्या अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), 19 पेन्शन देणाऱ्या बँका, पेन्शन वेलफेअर असोसिएशन, तसेच रेल्वे मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि EPFO सारख्या संस्थांचा सहभाग आहे.
📍 राज्यनिहाय प्रमुख शिबिरे:
- उत्तर प्रदेश – 170 शिबिरे
- मध्य प्रदेश – 127 शिबिरे
- बिहार – 114 शिबिरे
- ओडिशा – 110 शिबिरे
- महाराष्ट्र – 106 शिबिरे
🏦 बँकनिहाय प्रमुख शिबिरे:
- स्टेट बँक ऑफ इंडिया – 82
- पंजाब नॅशनल बँक – 31
- बँक ऑफ इंडिया – 27
- इंडियन बँक – 24
- बँक ऑफ बडोदा – 24
दुर्गम भागातील पेन्शनधारकांसाठी IPPB आपल्या 1.8 लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांमार्फत 1600 जिल्हा व उपविभागीय पोस्ट ऑफिसमधून शिबिरे घेणार आहे. यामुळे हयातीचा दाखला सादर करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.