Loni Kalbhor Crime: ‘आरपीआयची महिला नेता’ असल्याची धमकी देत 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

0
Loni Kalbhor Crime: ‘आरपीआयची महिला नेता’ असल्याची धमकी देत 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Loni Kalbhor Crime: ‘आरपीआयची महिला नेता’ असल्याची धमकी देत 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल


लोणी काळभोर येथे आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देत व्यवसायिकाच्या 2 गुंठे जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तीन जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे २५ डिसेंबर २०२५ : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात जमीन हडप करण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देत व्यवसायिकाच्या दोन गुंठे जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 1693 मध्ये बुधवारी दुपारी अडीज ते साडेचारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रुपाली महादेव काळभोर, अशोक आणाराव सुर्यवंशी आणि प्रितम सावंत, सर्व राहणार लोणी काळभोर, यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हजीलाल शब्बीर शेख (वय 45, रा. मंत्रिमार्केट, हडपसर, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हजीलाल शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन 2019 मध्ये भाऊसाहेब फुले यांच्याकडून संबंधित जमीन कायदेशीररीत्या खरेदी केली होती. खरेदीनंतर या जमिनीची ‘क’ प्रत तयार करून जमिनीभोवती सिमेंटचे कंपाउंड उभारण्यात आले होते. गेल्या सात वर्षांपासून ही जमीन शेख यांच्या ताब्यात असून, त्यावर कोणताही वाद नव्हता.

बुधवारी दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास आरोपी रुपाली काळभोर, अशोक सुर्यवंशी आणि प्रितम सावंत हे थेट फिर्यादीच्या जमिनीजवळ आले. त्यांनी शेख यांना शिवीगाळ करत ही जमीन गायरान असल्याचा दावा केला आणि “तुम्ही पुन्हा येथे पाय ठेवू नका” अशी धमकी दिली. यावेळी रुपाली काळभोर यांनी आपण आरपीआयची मोठी महिला नेता असल्याचे सांगत, पुन्हा या ठिकाणी आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तसेच आरोपींनी थेट जमिनीत प्रवेश करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शेख यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत कलम 329 (3), 351 (2), 352 आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय ओळखीचा गैरवापर करून जमीन हडप करण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या आणि सीमावादग्रस्त जमिनींवर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत. आरोपींच्या भूमिकेची चौकशी, जमीन कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून, तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed