Malegaon Sugar Factory Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा दणदणीत विजय
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांचा जबरदस्त विजय
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांचा जबरदस्त विजय; विरोधी पॅनलच्या उमेदवाराला मिळाली केवळ 10 मते..
सायली मेमाणे
बारामती २४ जून २०२५ : बारामती संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल लागला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून 91 पैकी तब्बल 91 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. हा निकाल मिळाल्याने श्री निळकंठेश्वर पॅनेलमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजित पवार यांच्याविरोधात तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनलचे भालचंद्र देवकाते हे उमेदवार म्हणून उभे होते. मात्र, त्यांना केवळ 10 मते मिळाल्याने त्यांचा दारुण पराभव झाला आहे. ही निवडणूक संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्गातून झाली असून, ही जागा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
विजयानंतर निळकंठेश्वर पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अजित पवार यांचा विजय हा आमच्यासाठी शुभ संकेत आहे. सभासदांनी त्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास दाखवला असून, आमचे सर्व उमेदवार यशस्वी होतील, असा विश्वास वाटतो.”
माळेगाव साखर कारखाना हा बारामती मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार वर्तुळाचे लक्ष होते. अजित पवार यांचा आजच्या विजयानंतर आगामी सर्व निकालांमध्ये निळकंठेश्वर पॅनेलला जोरदार फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz