एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये १५वी भारतीय छात्र संसद २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान; राजदीप सरदेसाई, दिग्विजय सिंह यांची उपस्थिती

0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये १५वी भारतीय छात्र संसद २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान; राजदीप सरदेसाई, दिग्विजय सिंह यांची उपस्थिती

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये १५वी भारतीय छात्र संसद २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान; राजदीप सरदेसाई, दिग्विजय सिंह यांची उपस्थिती


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १५वी भारतीय छात्र संसद होणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार.


पुणे १७ फेब्रुवारी २०२६ : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १५वी ‘भारतीय छात्र संसद’ दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडपात आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय छात्र संसदेत देशभरातील विद्यार्थी, तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी ही संसद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१५व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी असतील. समारोप सोहळा सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार असून या कार्यक्रमाला लोकसभा खासदार अनुराग सिंह ठाकूर, खासदार डॉ. संदीप कुमार पाठक आणि माजी राज्यसभा सदस्य शाहिद सिद्दिकी उपस्थित राहणार आहेत.

या छात्र संसदेत उद्घाटन आणि समारोप समारंभासह लोकशाही, नेतृत्व विकास, शासन आणि सार्वजनिक धोरण या चार महत्त्वाच्या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रशासन, धोरण आणि नेतृत्व याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळावी, यासाठी यावर्षी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यापीठातील १०० वर्गखोल्यांमध्ये सुमारे ४०० तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा होणार असून प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

दि. २२ फेब्रुवारी रोजी वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारताची परीक्षा-केंद्रित शिक्षण व्यवस्था सर्जनशीलतेला मर्यादा आणते’ आणि ‘५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणामुळे समानतेला धक्का बसतो’ या समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्रे होणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी, संवाद कौशल्य आणि सार्वजनिक विषयांवरील जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावर्षी छात्र संसदेत ‘पॅव्हेलियन’ची नवीन संकल्पना राबविण्यात येत असून देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा या प्रदर्शनातून सादर केला जाणार आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांद्वारे भारताच्या प्रगतीचा आलेख आणि विविध क्षेत्रातील विकासाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाची माहिती आणि प्रेरणा मिळणार आहे.

भारतीय छात्र संसद ही विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, संविधानिक तत्त्वे आणि नैतिक नेतृत्व विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक आव्हानांबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय आणि राज्य शासनाच्या विविध विभागांसह अनेक राष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारी ही छात्र संसद विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांनी या छात्र संसदेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले विचार मांडावेत आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची संधी साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed