Mumbra Accident: जखमी तरुणाच्या उपचारात ठाणे महापालिकेच्या रुग्णालयाची अक्षम्य हलगर्जी, आईची हात जोडून विनवणी व्यर्थ
लोकलमधून पडून गंभीर जखमी झालेला आदेश भोईर नावाचा युवक आजही उपचारासाठी दरदर भटकतोय.
Mumbra Accident Update: अपघातात जखमी झालेल्या आदेश भोईरला ठाणे मनपा रुग्णालयात वेळेवर सोनोग्राफी मिळाली नाही. आईची हात जोडून विनवणी असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. रेल्वे प्रवासी संघटनांची कारवाईची मागणी.
सायली मेमाणे
२४ जून २०२५ : Mumbra Accident: अपघातात जखमी आदेश भोईरला ठाणे मनपा रुग्णालयात फरपट, आईची हात जोडून विनवणी व्यर्थ
मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून गंभीर जखमी झालेला आदेश भोईर नावाचा युवक आजही उपचारासाठी दरदर भटकतोय. या Mumbra Accident मध्ये आदेशच्या हाताला फ्रॅक्चर आणि पायाला सूज आली होती. अपघातानंतर ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलं होतं. मात्र सूज कायम राहिल्याने सोमवारी तो फॉलोअपसाठी रुग्णालयात परत गेला आणि तेथे सुरू झाली खरी फरपट.
आदेशला डॉक्टरांनी पायाची सोनोग्राफी करण्यास सांगितले असतानाही, हॉस्पिटल प्रशासनाने त्याची तक्रार ऐकूनही त्याला रिकाम्या हाताने घरी परत पाठवलं. आई मीना भोईर यांनी हात जोडून विनवण्या केल्या तरीही सोनोग्राफी करण्यात आली नाही. उलट, दुसऱ्या दिवशी यावे, असं सांगून त्यांना परत पाठवण्यात आलं. हे ठाणे मनपा रुग्णालय प्रशासनाचे अत्यंत असंवेदनशील वर्तन असल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
या Mumbra Accident नंतर आदेश गेल्या १५ दिवसांपासून कामावरही हजर होऊ शकलेला नाही. ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत. जखमेमुळे पुढील २-३ महिने तरी त्यांना कामावर जाता येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून मदतीची मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जखमी प्रवाशांना सरकारी मदत मिळणार असल्याचं शासनाने जाहीर केलं आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालय प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी.”
या घटनेतून स्पष्ट होतं की सरकारी रुग्णालयांमध्ये अजूनही रुग्णांबाबत असंवेदनशीलता कायम आहे. Mumbra Accident सारख्या घटनांमध्ये जखमींना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो. त्यामुळे ठाणे मनपा रुग्णालय यासारख्या शासकीय संस्थांनी जबाबदारीने वागणं आवश्यक आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz