Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घराणेशाही’चा डंका; दिग्गज नेत्यांच्या सुपुत्रांची महापालिकेत दिमाखात एन्ट्री

0
Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घराणेशाही’चा डंका; दिग्गज नेत्यांच्या सुपुत्रांची महापालिकेत दिमाखात एन्ट्री

Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घराणेशाही’चा डंका; दिग्गज नेत्यांच्या सुपुत्रांची महापालिकेत दिमाखात एन्ट्री

Pimpri-Chinchwad Municipal Election 2026 मध्ये राजकीय वारशाचा प्रभाव दिसून आला. दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीने विजय मिळवत महापालिकेत भक्कम एन्ट्री केली.

पुणे १८ जानेवारी २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत यंदा राजकीय वारसा आणि घराणेशाहीचा ठळक प्रभाव पाहायला मिळाला. शहरातील अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीने निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात तरुण चेहऱ्यांची ताकद वाढताना दिसत असून, अनुभवी नेत्यांनीही आपली प्रतिष्ठा यशस्वीपणे जपल्याचे चित्र आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष, खासदार, आमदार आणि माजी महापौर अशा बड्या नेत्यांच्या सुपुत्र-सुपुत्रींनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत महापालिकेत दिमाखात एन्ट्री केली. त्यामुळे ‘घराणेशाही विरुद्ध नव्या नेतृत्वाचा संघर्ष’ या चर्चेला नव्याने उधाण आले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. भाजपचे कमलेश वाळके यांचा पराभव करत त्यांनी आपली पहिलीच निवडणूक यशस्वी केली. वडिलांनी केलेली विकासकामे आणि जनसंपर्क हाच विजयाचा पाया ठरल्याचे सिद्धार्थ बनसोडे यांनी सांगितले.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी भाजपचे सिद्धेश्वर बारणे यांचा पराभव करत पहिल्याच प्रयत्नात महापालिकेत प्रवेश केला. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी विजयानंतर व्यक्त केला.

भाजपने प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपला दबदबा कायम ठेवला. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. नीलिमा पवार यांचा पराभव केला. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या संदीप चव्हाण यांचा पराभव केला आणि पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक होण्याचा मान मिळवला.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. भाजपचे गणेश मळेकर यांचा पराभव करत त्यांनी राजकारणातील दमदार एन्ट्री केली. कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जनसेवेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात उतरलो असल्याची भावना यश साने यांनी व्यक्त केली.

या सर्व निकालांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अनुभव आणि वारसा यासोबतच तरुण नेतृत्वाचा प्रभाव वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात हे नवखे नगरसेवक महापालिकेच्या कारभारात नेमकी कोणती भूमिका बजावतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *