“प्रभाग ३७ मध्ये ‘सुलक्ष्मी हिरामण धनकवडे’ यांच्याकडून महिला सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न”
"प्रभाग ३७ मध्ये 'सुलक्ष्मी हिरामण धनकवडे' यांच्याकडून महिला सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न"
प्रभाग ३७ धनकवडी–कात्रज डेअरी महिला सुरक्षितता, आरोग्य, युवक व सामाजिक उपक्रमांमुळे सुलक्ष्मी हिरामण धनकवडे यांचे कार्य चर्चेत आहे.
पुणे ९ जानेवारी २०२६ : स्त्री सशक्तीकरणाचा थेट संबंध स्त्रीच्या सुरक्षिततेशी आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेवून प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी–कात्रज डेअरी) परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. महिला सुरक्षितता, आरोग्य आणि युवकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सौ. सुलक्ष्मी हिरामण धनकवडे यांच्या कामाची स्थानिक पातळीवर दखल घेतली जात आहे.
‘स्त्री शक्ती’ हेल्पलाईनद्वारे महिला सुरक्षिततेकडे ठोस पाऊल
पुणे शहरात वाढत्या महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाय म्हणून ‘स्त्री शक्ती हेल्पलाईन’चे अनावरण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. लाल महाल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष हिरामण धनकवडे, शहराध्यक्ष अॅड. रविंद्र तायडे, साईली नांगरे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
फिटनेसच्या माध्यमातून समाजघडणीकडे वाटचाल
साई फिटनेस क्लब, धनकवडीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सुलक्ष्मी धनकवडे यांचा प्रवास समाजाभिमुख आहे. “आरोग्य हेच खरे वैभव” या विचारातून त्यांनी फिटनेस, खेळ आणि शिस्तीच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक दिशेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
जिम प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांमुळे अनेक युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यात मदत झाली आहे.
सामाजिक उपक्रमांतून निर्माण झालेली विश्वासाची नाळ
सामाजिक कार्य करत असताना महिलांचे प्रश्न, युवकांच्या अडचणी, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जवळून अनुभवायला मिळाल्याचे त्या सांगतात. या अनुभवातून केवळ समाजसेवा नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने त्या आता धनकवडी प्रभाग क्रमांक ३७ मधून निवडणूक लढवत आहेत.
रक्तदान, समाजसेवा आणि पर्यावरणाचा संदेश
४ नोव्हेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ (पुणे शहर क्रीडा समिती) चे अध्यक्ष हिरामण हनुमंत धनकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तब्बल १७० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक रक्तदात्यास तुळशीचे रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.
दिव्यांग आणि सामाजिक समावेशनासाठी पुढाकार
दिव्यांग व्यक्तींसाठी २०२२ मध्ये आयोजित केलेल्या चेस स्पर्धेमध्ये शेकडो खेळाडू व प्रेक्षक सहभागी झाले. “दिव्यांग नव्हे, तर सक्षम खेळाडू” ही ओळख निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विकासाचा दृष्टिकोन
स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा, महिला सुरक्षितता, युवकांसाठी खेळाची मैदाने आणि मूलभूत नागरी सुविधा मजबूत करणे, हा सौ. सुलक्ष्मी धनकवडे यांचा ठाम संकल्प आहे. प्रामाणिक, स्वच्छ आणि कार्यक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information