जनगणना कामकाजासाठी ₹70.88 लाखांचा निधी तांत्रिक सहाय्यक व MTS नियुक्तीला मंजुरी
जनगणना कामकाजासाठी ₹70.88 लाखांचा निधी तांत्रिक सहाय्यक व MTS नियुक्तीला मंजुरी
Pune Municipal Corporation स्थायी समितीत जनगणनेसाठी ₹70.88 लाखांच्या निविदेला मंजुरी. अध्यक्ष Shrinath Bhimale यांची माहिती.
पुणे ०७ एप्रिल २०२६ : जनगणनेचे काम अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी तांत्रिक सहाय्यक (Technical Assistants) व मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) नियुक्त करण्यास ₹70 लाख 88 हजार रुपयांच्या निविदेला Pune Municipal Corporationच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. ही माहिती स्थायी समिती अध्यक्ष Shrinath Bhimale यांनी दिली.
भिमाले म्हणाले, “जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया आहे. तिची अचूक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी ही निविदा मंजूर करण्यात आली आहे.”
जनगणना प्रक्रियेचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:
- १ मे ते १५ मे : नागरिकांसाठी स्व-जनगणना (Self Enumeration) सुविधा
- १६ मे ते १४ जून : प्रत्यक्ष क्षेत्रीय जनगणना
या संपूर्ण प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, प्रत्येक घराची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवली जाईल. त्यामुळे माहिती अधिक अचूक, पारदर्शक आणि सुरक्षित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जनगणनेतून शहराच्या विकासासाठी आवश्यक अचूक माहिती मिळते. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information