Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर, घशाचा संसर्ग आणि छातीत खोकला
Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर, घशाचा संसर्ग आणि छातीत खोकला
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. छातीत संसर्ग आणि सतत खोकला; सुप्रिया सुळे म्हणतात, उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
पुणे १० जानेवारी २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे सोमवारी (९ फेब्रुवारी) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक माहिती नुसार, शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत होता, त्यामुळे त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यात हलवण्यात आले. हॉस्पिटलचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले की, शरद पवार यांचे छातीचे सीटी स्कॅन करण्यात आले, ज्यात छातीमध्ये संसर्ग असल्याचे स्पष्ट दिसून आले.
हॉस्पिटलमध्ये दाखल असताना पवार यांच्यासोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते. काही वेळात नातू रोहित पवार देखील पोहोचला. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, आणि जय पवार यांनीही शरद पवार यांची प्रकृती पाहण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली.
प्राथमिक तपासणीनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. त्यांच्या उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, छातीत संसर्ग असून सतत खोकला आणि जळजळ होत असल्यामुळे त्यांना पाच दिवसांचा अँटिबायोटिक्सचा उपचार सुरू करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली की, “बाबांना छातीत कफ झाला आहे. डॉक्टरांनी पाच दिवसांचा अँटिबायोटिक्सचा उपचार सुचवला आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचार सुरू असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.”
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजित लोढा यांनी सांगितले की, “शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांतील धावपळीमुळे त्यांना थकवा जाणवत होता. छातीमध्ये थोडा कफ असल्याने श्वसनाशी संबंधित तपासणीही करण्यात आली आहे. सध्या त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले आहे आणि ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही.”
शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या नियमित निरीक्षणाखाली त्यांचा उपचार सुरू आहे. संसर्गावर योग्य काळजी घेतल्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बातमीनंतर जनतेत आणि राजकीय वर्तुळात शरद पवार यांची प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली, परंतु तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे स्थिती नियंत्रणात असल्याने आश्वासक वातावरण आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information