ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

0
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले. मेट्रो 4 आणि मेट्रो 8 प्रकल्पाला गती; ठाणेकरांना लवकरच जलद प्रवासाचा अनुभव मिळणार.

सायली मेमाणे

पुणे ३ सप्टेंबर २०२५ : ठाणेकरांसाठी एक गूडन्यूज समोर आली आहे. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठाणे मेट्रो प्रकल्पात महत्त्वाची प्रगती झाली असून सहा स्थानकांसाठी आवश्यक गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ठाणे आणि परिसरातील नागरिकांना भविष्यात मेट्रोच्या माध्यमातून जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे मेट्रो 4 आणि मेट्रो 8 च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 13 किलोमीटरच्या मार्गापैकी 6.90 किलोमीटरवरील गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, प्रकल्पाच्या वेगाने पुढे जाण्यासाठी ही मोठी पायरी ठरली आहे. गार्डरचे काम पूर्ण झाल्यामुळे आता स्थानकांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रवाशांना मेट्रो सेवा मिळण्यासाठी वाट अधिक जवळ आली आहे.

ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या महत्त्वाच्या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील सहा महत्त्वाच्या नोड्समध्ये कासारवडवली, जोशी डोंगरी, मानपाडा, डीजीवाडी, विजय गार्डन आणि माजिवडा यांचा समावेश आहे. येथे प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे काम अधिक वेगाने आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत आहे.

पहिल्या टप्प्यातील काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणेकरांना दररोज प्रवासात वेळेचा अपव्यय आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर ही समस्या लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.

ठाणे मेट्रो प्रकल्प हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून, ठाणेकरांच्या जीवनशैलीत मोठा बदल घडवणारा उपक्रम ठरणार आहे. वेळेची बचत, इंधनाचा कमी वापर, पर्यावरणपूरक प्रवास आणि वाहतुकीच्या दाबात घट अशा अनेक सोयी नागरिकांना या प्रकल्पामुळे मिळणार आहेत. मुंबई आणि ठाणे यांच्यातील दळणवळण अधिक सुकर होऊन आर्थिक आणि सामाजिक विकासालाही गती मिळेल.

ठाणेकरांची मेट्रोसाठी असलेली प्रतीक्षा आता संपत आल्याचे चित्र दिसत आहे. गार्डरची कामे पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली आहे आणि लवकरच मेट्रो मार्गावरील प्रवास प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या मेट्रोमुळे केवळ ठाणेकरांचा प्रवासच सुकर होणार नाही तर मुंबईच्या वाहतुकीवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होईल. भविष्यातील प्रवाशांसाठी हा प्रकल्प मोठ्या सोयीचा ठरणार असून, शहराच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed