Dapodi परवानगीशिवाय आंदोलन करणं पडलं महागात; दापोडीत 38 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

0
परवानगीशिवाय आंदोलन करणं पडलं महागात

परवानगीशिवाय आंदोलन करणं पडलं महागात

दापोडीतील शितळा माता चौकात 22 जून रोजी पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन; 38 आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू.

सायली मेमाणे

२६ जून २०२५ : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे २२ जून रोजी पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यामुळे ३८ आंदोलकांविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितळा माता चौकात झेंडे आणि फलक हातात घेऊन घोषणा देत आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. मात्र या आंदोलनासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर पावले उचलली.

ख्रिस्ती समाज समन्वय समितीतर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते, असे समजते. यामध्ये सुनील किसन उबाळे, जॉर्ज मदनकर, सागर केदारी, रिबेका शिंदे, दिलीप ठोंबरे, सतीश पटेकर, नितीन गायकवाड, विजय गायकवाड, मनोज मिसाळ, बन्सामीन काळे, फ्रान्सिस गजभिव, मंगेश बोधक, ग्लोरी ससाणे, मायकल गजनाडार, फॅबियन अण्णा सॅमसन, राजेश नायर, जॉन्सन पावलस, प्रशांत केदारी, डेव्हिड काळे, डेव्हिड पहेलवान, पवन गायकवाड यांच्यासह आणखी १५ ते १७ जण सहभागी होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर यांनी फिर्याद दिली असून, सर्व आंदोलनकर्त्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी ठराविक वेळेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून कायद्याचे उल्लंघन केले. अशा प्रकारचे आंदोलन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या अडथळ्यासाठी कारणीभूत ठरू शकते, म्हणून कायद्याचे पालन न झाल्यास पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात, हिंदी भाषा सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीचा निषेध करत मराठी भाषेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. “हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडू,” असा इशारा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दिला. हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी महाराष्ट्रात भाषिक अस्मितेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed